Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Career Coach: करिअर निवडीबाबत प्रश्न पडलायं? मग AI ला विचारा ‘हे’ ५ महत्त्वाचे प्रश्न..

AI Career Coach Tools: कंपन्यांकडून नोकरीचे अर्ज स्कॅन करण्यासाठी एआयचा वापर वाढला आहे. अशा वेळी चॅटजीपीटी आणि जेमिनीसारख्या टूल्सचा वापर करून बायोडाटा व मुलाखतीची तयारी कशी करावी, याचे ५ सोपे प्रश्न आणि सल्ले वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 15, 2026 | 12:53 PM
ai career coach

ai career coach

Follow Us
Follow Us:

AI Career Coach Tools: आजच्या काळात नोकरी किंवा इंटर्नशिप शोधणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे. प्रत्येक एका जागेसाठी हजारो अर्ज येतात आणि कंपन्या आता हे अर्ज वेगाने तपासण्यासाठी एआयचा (AI) वापर करत आहेत. अशा परिस्थितीत, फक्त एक चांगला रिज्युमे असणे पुरेसे नाही, तर तुमचे प्रोफाईल इतर उमेदवारांपेक्षा वेगळे आणि प्रभावी दिसणे देखील गरजेचे आहे. याच कारणामुळे आता चॅटजीपीटी, मायक्रोसॉफ्ट कोपायलट आणि गुगल जेमिनी यांसारखी एआय टूल्स विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठे मदतनीस ठरत आहेत. चला तर मग जाणून घेऊया की करिअरशी संबंधित उत्तम सल्ला मिळवण्यासाठी ओपन एआयला नेमके कोणते ५ प्रश्न विचारले पाहिजेत.

नोकरीच्या शोधात AI का ठरतेय मदतनीस?

आज मोठ्या कंपन्यांना दररोज हजारो जॉब ॲप्लिकेशन्स मिळतात. ‘लिंक्डइन’नुसार, गेल्या एका वर्षात नोकरीसाठी पाठवल्या जाणाऱ्या अर्जांची संख्या ४५ टक्क्यांहून अधिक वाढली आहे आणि दर मिनिटाला सुमारे ११ हजार अर्ज पाठवले जात आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार, १० पैकी तब्बल ९ नियोक्ते आता एआयच्या मदतीने उमेदवारांचे अर्ज आधीच स्कॅन आणि रँक करतात. अशा स्पर्धात्मक वातावरणात तुमचा रिज्युमे आणि प्रोफाईल उठून दिसणे आणि योग्य पद्धतीने तयार असणे अत्यंत आवश्यक आहे.

AI ला आपला करिअर कोच कसे बनवावे?

ओपन एआयचे चॅटजीपीटी हे केवळ प्रश्नांची उत्तरे देणारे टूल नाही. जर त्याचा योग्य पद्धतीने वापर केला, तर ते करिअर प्लॅनिंग, रिज्युमे सुधारणे, मुलाखतीची तयारी, नवीन कौशल्ये ओळखणे आणि करिअरशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करू शकते. यासाठी सर्वप्रथम एआयला तुमचे शिक्षण, कौशल्ये, अनुभव आणि करिअरचे ध्येय स्पष्टपणे सांगा, जेणेकरून ते त्याच आधारावर तुम्हाला अधिक चांगले सल्ले देऊ शकेल.

करिअरच्या मार्गदर्शनासाठी नक्की विचारा ‘हे’ ५ प्रश्न

१. माझ्यासाठी सर्वोत्तम करिअर पर्याय कोणते आहेत ?

जर तुम्ही करिअर निवडीबाबत गोंधळात असाल, तर एआयला तुमच्या शिक्षणाची, कौशल्यांची आणि आवडीची माहिती द्या. त्यानंतर तुमच्या प्रोफाईलनुसार कोणते करिअर पर्याय सर्वात उत्तम ठरू शकतात, असे विचारून घ्या. एआय तुम्हाला सध्याच्या जॉब मार्केटमधील आणि नव्याने उदयास येणाऱ्या करिअर पर्यायांची सविस्तर माहिती देऊ शकते.

२. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी कोणती नवीन कौशल्ये शिकली पाहिजेत ?

जर तुम्ही तुमचे जॉब प्रोफाईल आधीच निश्चित केले असेल, तर त्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कोणत्या तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्सना सध्या सर्वाधिक मागणी आहे, हे एआयला विचारा. यामुळे तुम्हाला नेमक्या कोणत्या कौशल्यांवर काम करणे गरजेचे आहे आणि पुढील तयारी कशी करावी, हे समजणे सोपे जाईल.

AI Impact in China: चीनमध्ये रोबो आणि एआयचा धुमाकूळ! ‘या’ क्षेत्रातील कामांवर मिळवला ताबा; कामगारांचे काय होणार?

३. नोकरीच्या गरजेनुसार माझा रिज्युमे कसा सुधारावा ? 

प्रत्येक नोकरीसाठी एकच रिज्युमे पाठवणे चुकीचे मानले जाते. एआयला तुमचा सध्याचा रिज्युमे आणि ज्या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे, त्याचे जॉब डिस्क्रिप्शन द्या. त्यानंतर एटीएस-फ्रेंडली रिज्युमे तयार करण्यासाठी, योग्य कीवर्ड्स जोडण्यासाठी आणि तुमची कामगिरी प्रभावीपणे मांडण्यासाठी एआयची मदत घ्या.

४. मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ?

मुलाखतीच्या तयारीसाठी एआय अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कंपनीचे नाव आणि जॉब प्रोफाईल सांगून संभाव्य तांत्रिक आणि वर्तणूकविषयक मुलाखतीचे प्रश्न तयार करण्यास सांगा. त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे स्वतः तयार करून सराव करा. एआयने दिलेली उत्तरे जशीच्या तशी पाठ करण्याऐवजी ती तुमच्या अनुभवानुसार स्वतःच्या शब्दांत बदलणे अधिक चांगले ठरेल.

Tech Jobs Update: तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराची मोठी लाट! २०३० पर्यंत भारतात १ लाख इंजिनिअर्सची भासणार गरज

५. करिअरमधील अडचणींवर कसा मार्ग काढावा ?

जर तुम्हाला बढती मिळत नसेल, करिअर बदलायचे असेल किंवा वर्क-लाइफ बॅलन्स साधण्यात अडचण येत असेल, तर एआयला तुमची परिस्थिती सविस्तर सांगा. त्यावर उपाय आणि एक स्पष्ट ॲक्शन प्लॅन मागा. एआय तुमच्या समस्येच्या आधारावर वेगवेगळे पर्याय आणि पुढे जाण्यासाठी योग्य सल्ले देऊ शकते.

Web Title: Ai tools for job search chatgpt gemini ai career coach ats friendly resume tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • ai
  • career guide

संबंधित बातम्या

AI in India: भारतात AI वापर झपाट्याने वाढतोय; पण AI शिकताना लोकांना ‘या’ अडचणींचा सामना करावा लागतोय!
1

AI in India: भारतात AI वापर झपाट्याने वाढतोय; पण AI शिकताना लोकांना ‘या’ अडचणींचा सामना करावा लागतोय!

AI Impact on Jobs: AI मुळे नोकऱ्या संपणार की वाढणार? नवीन रिपोर्टनुसार जाणून घ्या कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे प्रचंड मागणी
2

AI Impact on Jobs: AI मुळे नोकऱ्या संपणार की वाढणार? नवीन रिपोर्टनुसार जाणून घ्या कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे प्रचंड मागणी

OpenAI News : OpenAI मधील ‘एथिक्स’ प्रमुखांची वर्षभरातच एक्झिट; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे चर्चेला उधाण
3

OpenAI News : OpenAI मधील ‘एथिक्स’ प्रमुखांची वर्षभरातच एक्झिट; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे चर्चेला उधाण

Career Guide: फुल-टाइम जॉब की फ्रीलांसिंग निवडावे? कोणता पर्याय तुमच्या भविष्यासाठी ठरेल सर्वोत्तम!
4

Career Guide: फुल-टाइम जॉब की फ्रीलांसिंग निवडावे? कोणता पर्याय तुमच्या भविष्यासाठी ठरेल सर्वोत्तम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.