Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditi Yadav Rumors: अदिती यादव नेमकी कुठे शिकते, लंडन की दिल्ली? अखिलेश यादव यांच्या मुलीबद्दलच्या अफवांची पोलखोल!

Aditi Yadav Education Profile: सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची मुलगी अदिती यादव हिच्याबद्दल सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्या आणि तिचे खरे शैक्षणिक रेकॉर्ड काय आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 14, 2026 | 01:43 PM
आदिती यादव

आदिती यादव

Follow Us
Follow Us:

Aditi Yadav Fake News: समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव आणि मैनपुरीच्या खासदार डिंपल यादव यांची मोठी मुलगी अदिति यादव सध्या अचानक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक प्रकारच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. हे प्रकरण इतके वाढले की, तो राजकीय वादाचा विषय बनला आणि थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देत कडक शब्दांत टीका केली.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अदिती यादवबद्दल अनेक बनावट पोस्ट व्हायरल होत होत्या. काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, ती परदेशात शिक्षण घेत आहे आणि कुटुंबाचे कोट्यवधी रुपये घेऊन गायब झाली आहे. इतकेच नाही तर तिच्या फोटोंचा गैरवापर करून खोट्या कहाण्या रचण्यात आल्या. या सर्व पार्श्वभूमीवर अदिती यादव नेमकी कोण आहे, ती काय शिक्षण घेत आहे आणि तिच्याबद्दल पसरणाऱ्या बातम्यांमागचे सत्य काय आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कोण आहे अदिति यादव?

अदिति यादव ही अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांची मोठी मुलगी आहे. तिचा जन्म २६ ऑगस्ट २००२ रोजी झाला. ती सक्रीय राजकारणापासून दूर राहते आणि सहसा प्रसारमाध्यमे किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये खूप कमी पाहायला मिळते. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ती आपली आई डिंपल यादव यांच्यासोबत निवडणूक प्रचारात दिसली होती, ज्यानंतर ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली.

Germany Work Visa: नोकरीची ऑफर नसली तरी जर्मनीला जाता येणार? जाणून घ्या ‘अपॉर्च्युनिटी कार्ड’चे नवीन नियम!

अदितीने शालेय शिक्षण कोठून पूर्ण केले?

अदिति यादवने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण लखनऊमधील नामांकित ‘ला मार्टिनियर गर्ल्स कॉलेज’ (La Martiniere Girls College) मधून पूर्ण केले. वर्ष २०२० मध्ये तिने १२ वीच्या बोर्ड परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवले होते. तिच्या या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची त्यावेळी सर्वत्र खूप चर्चा झाली होती.

अदिति यादव सध्या कुठे शिकत आहे?

दावा १ : काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती लंडनच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’ (UCL) मधून ‘राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयाचे शिक्षण घेत आहे.

दावा २ : तर काही अन्य अधिकृत विधानांच्या आधारे असाही दावा केला गेला आहे की, ती भारतातच आपले शिक्षण सुरू ठेवून आहे आणि दिल्ली युनिव्हर्सिटीच्या ‘फॅकल्टी ऑफ लॉ’मधून कायद्याचे (Law) शिक्षण घेत आहे.

Jobs Without Degree 2026: १२ वी नंतर कॉलेजला ‘बाय-बाय’ करून ‘या’ ३ क्षेत्रांत करा लाखोंची कमाई…

सोशल मीडियावर वाद नेमका का सुरू झाला?

सोशल मीडियावर काही समाजकंटकांनी अदिती यादवचा फोटो वापरून ती कोट्यवधी रुपये घेऊन गायब झाल्याच्या पोस्ट शेअर केल्या. या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. केवळ राजकीय द्वेषातून तिची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी या अफवा मुद्दाम पसरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Akhilesh yadav daughter aditi yadav fake news trolls education reality marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Akhilesh yadav
  • education
  • Samajwadi Party

संबंधित बातम्या

Importance of Mathematics: गणित विषयाला घाबरता? एकदा हा दृष्टिकोन समजून घ्या, प्रत्येक गणिती कोडं वाटेल सोपं!
1

Importance of Mathematics: गणित विषयाला घाबरता? एकदा हा दृष्टिकोन समजून घ्या, प्रत्येक गणिती कोडं वाटेल सोपं!

How to Use AI: NEET, JEE आणि UPSC तयारी आता होणार आणखी सोपी; AI ठरणार विद्यार्थ्यांचा स्मार्ट स्टडी पार्टनर!
2

How to Use AI: NEET, JEE आणि UPSC तयारी आता होणार आणखी सोपी; AI ठरणार विद्यार्थ्यांचा स्मार्ट स्टडी पार्टनर!

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!
3

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!

Nalanda Medical College: नालंदा मेडिकल कॉलेजच्या १४६ विद्यार्थ्यांना ३ महिन्यांसाठी केले सस्पेंड; पण नेमकं प्रकरण काय?
4

Nalanda Medical College: नालंदा मेडिकल कॉलेजच्या १४६ विद्यार्थ्यांना ३ महिन्यांसाठी केले सस्पेंड; पण नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.