(फोटो- istockphoto)
महाविद्यालयाचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमधील दस्तऐवज अपलोड करा या पर्यायातून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रवेशासाठी पुढे जा या पर्यायाद्वारे प्रवेशास सहमती नोंदवावी. त्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विहित मुदतीत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
CA Foundation May 2026 Result OUT: सीए फाऊंडेशन मे परीक्षेचा निकाल, ICAI स्कोअरकार्ड कसे तपासाल
विद्यार्थ्यांनी इन-हाऊस, अल्पसंख्याक आणि केंद्रीय कोट्यांतून प्रवेश निश्चित करण्यासाठी ३ ते ५ जुलै हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आपल्या लॉगिनमध्ये जाऊन महाविद्यालयाचे वाटप तपासावे, असेही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले नाही, त्यांनी इयत्ता दहावीतील गुण आणि संबंधित महाविद्यालयांचे कट-ऑफ लक्षात घेऊन पुढील फेरीसाठी प्रवेश अर्जाच्या भाग-२ मध्ये नवीन पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करावा व त्याची प्रत जतन करावी.
विशेष फेरीची आकडेवारी
-पात्र विद्यार्थी – ८९,६६३
-महाविद्यालयाचे वाटप झालेले विद्यार्थी – २८,२३४
-पहिल्या पसंतीचे महाविद्यालय – १६,८४२
-दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय – ५,७२७
-तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय – २,२००
विद्यार्थी आकडेवारी
अभ्यसक्रम – वाटप केलेले विद्यार्थी
-कला – १५,९८८
-वाणिज्य – १८,४७१
-विज्ञान – ४३,००७
एकूण – ७७,४६६
सीए फाऊंडेशन मे परीक्षेचा निकाल
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ३ जुलै रोजी सीए फाउंडेशन मे २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर वापरून icai.org या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासू शकतात. ICAI ने गुणवत्ता यादी जाहीर करण्याबरोबरच सकाळी ११ वाजता निकाल पाहण्याची लिंक देखील सक्रिय करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करून त्यांचे गुण तपासणे सोपे जाईल. विद्यार्थी ICAI सीए फाउंडेशन मे २०२६ परीक्षेचे गुणपत्रक (स्कोरकार्ड) देखील डाउनलोड करू शकतात.






