Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10वी-12वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Army Ordnance Corps मध्ये २,६१५ पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

भारतीय सैन्य दलाच्या Army Ordnance Corps (AOC) मध्ये २,६१५ ग्रुप सी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. १०वी, १२वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदाची पात्रता जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 27, 2026 | 03:58 PM
army

army

Follow Us
Follow Us:

भारतीय सैन्य दलाच्या ‘आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स’ (Army Ordnance Corps – AOC) अंतर्गत ग्रुप सी मधील विविध पदांच्या एकूण २,६१५ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे ट्रेड्समन मेट, फायरमन, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) आणि मटेरियल असिस्टंट यांसारखी पदे भरली जाणार आहेत. यात सर्वाधिक पदे ट्रेड्समन मेट (१,७९९ पदे) आणि फायरमन (५०८ पदे) पदांसाठी असून, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक पदासाठी १०४, एमटीएससाठी १४२ आणि मटेरियल असिस्टंटसाठी ५० जागांचा समावेश आहे.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. ट्रेड्समन मेट, फायरमन आणि एमटीएस पदांसाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर कनिष्ठ कार्यालय सहाय्यक पदासाठी १२ वी उत्तीर्ण असण्यासह इंग्रजी किंवा हिंदी टायपिंगचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच मटेरियल असिस्टंट पदासाठी उमेदवाराकडे पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट किंवा अभियांत्रिकीमधील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि वेतन श्रेणी

वयोमर्यादेचा विचार करता, बहुतांश पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असून मटेरियल असिस्टंट पदासाठी १८ ते २७ वर्षे आहे. तसेच सरकारी नियमांनुसार SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदकानुसार दरमहा १८,००० रुपये ते ९२,३०० रुपयांपर्यंत आकर्षक वेतन मिळणार आहे.

GMC Sindhudurg Bharti 2026: सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदांसाठी आज थेट मुलाखत; २ लाखांपर्यंत मिळणार पगार!

अधिक माहितीसाठी ‘या’ संकेतस्थळाला भेट द्या

सध्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.aocrecruitment.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

GATE 2027: गेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि परीक्षा पॅटर्न..

Web Title: Army ordnance corps aoc bharti 2026 2615 posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • army
  • Army Job
  • Government Job

संबंधित बातम्या

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज
1

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!
2

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ
3

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ

GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी आऊट! एका छोट्या चुकीमुळे रद्द होऊ शकते उमेदवारी; ‘या’ कागदपत्रांची ठेवा तयारी
4

GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी आऊट! एका छोट्या चुकीमुळे रद्द होऊ शकते उमेदवारी; ‘या’ कागदपत्रांची ठेवा तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.