Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात ‘स्वायत्त’ महाविद्यालयांची लाट! 5 वर्षांत संख्या झाली तिप्पट; तामिळनाडूनंतर देशपातळीवर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्रात स्वायत्त महाविद्यालयांची संख्या १९७ वर पोहोचली असून तामिळनाडूनंतर महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी आहे. युजीसी आणि नॅकच्या नियमांमुळे स्वायत्ततेचा मार्ग सोपा झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 22, 2026 | 06:48 PM
महाराष्ट्रात 'स्वायत्त' महाविद्यालयांची लाट! 5 वर्षांत संख्या झाली तिप्पट (Photo Credit- X)

महाराष्ट्रात 'स्वायत्त' महाविद्यालयांची लाट! 5 वर्षांत संख्या झाली तिप्पट (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • महाराष्ट्रात ‘स्वायत्त’ महाविद्यालयांची लाट!
  • 5 वर्षांत संख्या झाली तिप्पट
  • तामिळनाडूनंतर देशपातळीवर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
Autonomous Colleges in Maharashtra 2026: महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचा बदल होत आहे. यूजीसीच्या आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्रात 197 स्वायत्त (ऑटोनॉमस) महाविद्यालये आहेत, जी देशात तामिळनाडू खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काही वर्षांपूर्वी हीच संख्या अवघी 68 होती, म्हणजेच पाच वर्षांत ही संख्या जवळपास तिप्पट झाली आहे. हा केवळ एक आकडेवारीतील बदल नाही, तर महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाची संपूर्ण वास्तुरचना बदलण्याचा संकेत असल्याचे वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ सांगतात.

एखाद्या महाविद्यालयाला ‘स्वायत्त’ दर्जा मिळणे म्हणजे संस्थेला स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्याचा, परीक्षा घेण्याचा आणि निकाल जाहीर करण्याचा अधिकार मिळतो. यूजीसीच्या 2018 च्या नियमांनुसार, हा दर्जा मिळवण्यासाठी महाविद्यालयाला किमान 10 वर्षांचा अनुभव आणि नॅक मूल्यांकनात किमान ‘ए’ श्रेणी बंधनकारक आहे.

महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालयांचे सर्वाधिक केंद्रीकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत आहे, जेथे 18 हून अधिक महाविद्यालये या दर्जात आहेत. मुंबई, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये आघाडीवर असली, तरी विदर्भव मराठवाड्यातील अनेक जुन्या महाविद्यालयांना अद्याप हा दर्जा मिळालेला नाही. राज्यातील 11 विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात एकूण 157 ते 197 स्वायत्त महाविद्यालये आहेत, परंतु हे प्रमाण अजूनही भौगोलिकदृष्ट्या असमान आहे. शहरी भागात संधीचा अभाव, तर ग्रामीण भागात उपेक्षेचे साव असल्याचे तज्ज्ञ सागतात.

इंग्रजी शाळांना ‘संरक्षण कायदा’ लागू करा! संस्थाचालकांवरील हल्ले आणि खंडणीच्या प्रकारांमुळे ESM आक्रमक

नॅक, रुसा आणि सरकारी प्रोत्साहन : वाढीचे खरे कारण

या झपाट्‌याने होणाऱ्या वाढीमागे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा मोठा वाटा आहे. स्वायत्त दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत तब्बल 5 कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळण्याची तरतूद आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ने ‘ग्रेडेड ऑटोनॉमी’ला प्रोत्साहन दिल्यानंतर या प्रक्रियेला आणखी वेग आला आहे. परिणामी, उच्च गुणांकन मिळवणाऱ्या महाविद्यालयांनी आपोआपच या संधीकडे धाव घेतली व अर्जाचा ओघ वाढला.

महत्त्वाचे ट्रेंड आणि निरीक्षणे अशी…

देशपातळीवर तामिळनाडू (252), महाराष्ट्र (197), आंध्र प्रदेश (165) आणि तेलंगणा (124) हे स्वायत्त महाविद्यालयांच्या संख्येत आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण ट्रेंड म्हणजे, कला-वाणिज्य-विज्ञान या पारंपरिक शाखांबरोबरच आता व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि आरोग्य विज्ञान क्षेत्रातील महाविद्यालयेही स्वायत्त दर्जाकडे वळत आहेत. स्वायत्त महाविद्यालयातील प्राध्यापकांना नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धती राबविण्याची आणि स्वतंत्र मूल्यमापन प्रणाली तयार करण्याची संधी मिळते, ज्यामुळे अभ्यासक्रम आणि उद्योगजगत यांच्यातील अंतर कमी होते.

NEET UG 2026 : तुम्हालाही सरकारी मेडिकल कॉलेजमधून MBBS करायचंय? मग NEET UG परीक्षेत किमान ‘इतके’ गुण मिळवणं आहे अनिवार्य

Web Title: Autonomous colleges in maharashtra 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • Career News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.