Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Mandir CEO: आता ‘मंदिर व्यवस्थापक’ पदाला मोठी मागणी; राम मंदिराच्या नव्या नियमांमुळे ‘हा’ कोर्स आला चर्चेत

Ram Mandir CEO Rules: अयोध्या राम मंदिराच्या नवीन सीईओ निवडीसाठी 'टेंपल मॅनेजमेंट'चा अनुभव अनिवार्य करण्यात आला आहे. हा कोर्स नेमका काय आहे, त्याची पात्रता, फी आणि भारतातील संधींबद्दल वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 12, 2026 | 10:21 AM
RAM MANDIR

RAM MANDIR

Follow Us
Follow Us:

Ram Mandir CEO Rules:  अयोध्या येथील भव्य राम मंदिरासाठी नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा (CEO) शोध वेगाने सुरू झाला आहे. दिल्लीत पार पडलेल्या ‘राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’च्या सर्च कमिटीच्या पहिल्या बैठकीत नव्या प्रमुखाच्या निवडीसाठी कडक नियम निश्चित करण्यात आले आहेत. या हाय-प्रोफाइल पदासाठी उमेदवाराकडे किमान २० वर्षांचा प्रशासकीय किंवा वित्तीय (Financial) अनुभव असणे आवश्यक आहे. मात्र, सर्वात विषेश बाब म्हणजे, या निवडीमध्ये ‘टेंपल मॅनेजमेंट’ म्हणजेच मंदिर व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

देशातील मोठी श्रद्धास्थाने आणि धार्मिक स्थळांचा कारभार आता कॉर्पोरेट पद्धतीनुसार सांभाळला जात आहे. याच कारणामुळे टेंपल मॅनेजमेंट कोर्स वेगाने लोकप्रिय होत आहे. चला तर मग जाणून घेऊया टेम्पल मॅनेजमेंट कोर्सबद्दल सविस्तर..

टेंपल मॅनेजमेंट कोर्स काय आहे आणि त्यासाठी पात्रता काय?

ज्याप्रमाणे कोणतीही मोठी कंपनी चालवण्यासाठी ‘एमबीए’ (MBA) प्रोफेशनल्सची गरज असते, त्याचप्रमाणे मोठ्या मंदिरांचे व्यवस्थापन, गर्दीचे नियंत्रण (Crowd Management) आणि तिथला निधी सांभाळण्यासाठी टेंपल मॅनेजमेंटचे तज्ज्ञ तयार केले जातात. या क्षेत्रात सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि पीजी डिप्लोमा पातळीवरील कोर्सेस उपलब्ध आहेत.

पात्रता: शॉर्ट-टर्म किंवा डिप्लोमा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मोठ्या पदांसाठी किंवा पीजी डिप्लोमासाठी पदवी (Graduation) अनिवार्य आहे. राम मंदिराच्या सीईओ पदासाठी देखील किमान पात्रता पदवी ठेवण्यात आली आहे.

भारतात कुठे मिळते याचे शिक्षण ?

आंध्र युनिव्हर्सिटी (विशाखापट्टनम): येथे मंदिर व्यवस्थापनामध्ये डिप्लोमा कोर्स चालवला जातो.

तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD): तिरुपती बालाजी मंदिराशी संबंधित संस्था या व्यवस्थापनासाठी वेळोवेळी प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करतात.

मुंबई युनिव्हर्सिटी आणि काही संस्कृत युनिव्हर्सिटीज: यांच्या अंतर्गत हेरिटेज, रिलिजियस टुरिझम आणि मॅनेजमेंटशी संबंधित शॉर्ट टर्म कोर्सेस चालवले जातात.

RRB Answer Key: रेल्वेने जारी केली ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेची उत्तरतालिका; १७ जुलैपूर्वी आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

कालावधी आणि फी: टेंपल मॅनेजमेंटचे सर्टिफिकेट कोर्स साधारणपणे ३ ते ६ महिन्यांचे असतात. डिप्लोमा कोर्स १ वर्षाचा असतो, तर पीजी डिप्लोमा कोर्स १ ते २ वर्षांपर्यंतचा असू शकतो. या कोर्सची फी अत्यंत किफायतशीर आहे. सरकारी विद्यापीठे आणि अनुदानित संस्थांमध्ये या कोर्सची वार्षिक फी ५,००० रुपयांपासून ते २५,००० रुपयांपर्यंत असते. काही खासगी संस्था किंवा विशेष ट्रस्ट त्यांच्या पातळीवर वेगळी फी ठरवू शकतात.

टेंपल मॅनेजमेंट कोर्समध्ये काय शिकवले जाते?

टेंपल मॅनेजमेंट कोर्सचा अभ्यासक्रम अतिशय वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. यात केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक नियम शिकवले जात नाहीत, तर एक व्यावसायिक लीडर बनणे शिकवले जाते. यात प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश असतो:

क्राउड मॅनेजमेंट (गर्दीचे व्यवस्थापन): सणासुदीच्या काळात जमा होणाऱ्या लाखोंच्या गर्दीला कोणत्याही अपघाताशिवाय सुरक्षितपणे कसे हाताळायचे.

फायनान्स आणि ऑडिट: मंदिरात येणारे दान, चढावा आणि ट्रस्टच्या पैशांचा अचूक हिशोब ठेवणे.

कायदेशीर नियम: मंदिराशी संबंधित ट्रस्ट ॲक्ट, जमिनीचे वाद आणि सरकारी नियमांची माहिती असणे.

हॉस्पिटॅलिटी आणि स्वच्छता: भाविकांच्या राहण्याची, भोजनाची व्यवस्था करणे आणि मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे.

प्राचीन इतिहास आणि संस्कृती: मंदिरांची वास्तुकला, इतिहास आणि त्यांचे धार्मिक महत्त्व समजून घेणे.

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने

या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये

राम मंदिराच्या नव्या सीईओ पदासाठी अयोध्येत राहून ३ वर्षे काम करण्याची आणि हिंदू धर्माचा असण्याची अट ठेवण्यात आली आहे. प्रत्येक मंदिर आपल्या गरजेनुसार अशाच प्रकारे मार्गदर्शक तत्त्वे ठरवते. या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी उत्तम संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, संकट काळात त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, संयम, संपूर्ण टीमला सोबत घेऊन चालण्याचे कसब आणि सनातन परंपरांबद्दल गाढ निष्ठा असणे अत्यंत गरजेचे आहे.

Web Title: Ayodhya ram mandir ceo search temple management course eligibility fees career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • Government Job
  • Job
  • ram mandir

संबंधित बातम्या

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल
1

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे
2

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!
3

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा
4

Pimpri Chinchwad News: ITI पास तरुणांसाठी खूशखबर! वीजतंत्री ट्रेडसाठी २३ जागांवर भरती, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.