फोटो सौजन्य- सोशल मीडिया
RRB Answer Key 2026 Released: आरआरबी जेई सीबीटी-२ (RRB JE CBT-2) परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने परीक्षेची तात्पुरती आन्सर-की जाहीर केली आहे. आता उमेदवार आपल्या संभाव्य गुणांचा अंदाज लावू शकतात आणि जर कोणत्याही उत्तरावर आक्षेप असेल, तर ठरवून दिलेल्या वेळेत ऑनलाईन पद्धतीने तो नोंदवू शकतात.
रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ज्युनिअर इंजिनिअर (JE) सीबीटी-२ परीक्षा २०२६ ची तात्पुरती आन्सर-की जारी केली आहे. उमेदवार आता त्यांच्या लॉगिन तपशिलांच्या मदतीने अधिकृत वेबसाइटवर जाऊन आन्सर-की, रिस्पॉन्स शीट आणि प्रश्नपत्रिका पाहू शकतात. यामुळे उमेदवारांना त्यांनी दिलेल्या उत्तरांचा ताळमेळ लावून संभाव्य स्कोरचा अंदाज बांधता येईल.
या भरती मोहिमेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेमधील एकूण २,५८५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांमध्ये ज्युनिअर इंजिनिअर (JE), डेपो मटेरिअल सुपरिंटेंडेंट, chemical supervisor (केमिकल सुपरवायझर) आणि metallurgical assistant (मेटलर्जिकल असिस्टंट) यांसारख्या पदांचा यामध्ये समावेश आहे. सीबीटी-२ परीक्षेनंतर पुढील भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
जर एखाद्या उमेदवाराला आन्सर-कीमध्ये दिलेल्या कोणत्याही उत्तरावर आक्षेप असेल, तर तो ऑनलाईन माध्यमातून त्याला आव्हान देऊ शकतो. आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी अंतिम तारीख १७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:५० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. सर्व आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर अंतिम आन्सर-की (Final Answer Key) जाहीर केली जाईल आणि त्याच आधारे निकाल तयार केला जाईल.
आरआरबी जेई सीबीटी-२ परीक्षा एकूण १५० गुणांची असते. या परीक्षेतील प्रत्येक अचूक उत्तरासाठी १ गुण दिला जातो. तसेच चुकीच्या उत्तरासाठी एक-तृतीयांश (१/३) गुण वजा केले जातात. ज्या प्रश्नांची उत्तरे दिली गेलेली नाहीत, त्यावर कोणतेही गुण वजा केले जात नाहीत. उमेदवार याच आधारे आपल्या संभाव्य गुणांचा अंदाज लावू शकतात.
स्टेप १: सर्वात आधी रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://www.rrbcdg.gov.in वर जावे.
स्टेप २: होम पेजवर ‘RRB JE CBT 2 Answer Key 2026’ किंवा संबंधित लिंकवर क्लिक करावे.
स्टेप ३: आता तुमचा अर्ज क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख प्रविष्ट करून लॉगिन करावे.
स्टेप ४: लॉगिन केल्यानंतर तुमची आन्सर-की, रिस्पॉन्स शीट आणि प्रश्नपत्रिका स्क्रीनवर दिसेल.
स्टेप ५: सर्व दस्तऐवज डाऊनलोड करा आणि तुमच्या उत्तरांची पडताळणी करा.






