
गावकऱ्यांच्या दातृत्वातून बेंदेवाडी शाळेचा 'कायापालट'; पालकसभेतच जमा केली दीड लाखांची रोख रक्कम!
दशसुत्रीच्या प्रत्येक सुत्रांचे आपल्या जिवनात असलेले महत्व पिपीटीद्वारे तुषार गवई यांनी सादरीकरण केले. यावेळी शाळेच्या प्रगतीसाठी पालकांनी समाजसहभाग द्यावा असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले. आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित पालकांनी लगेच शाळेच्या रंगरंगोटी व आवश्यक गरजांसाठी एक लाख ५१ हजार रुपयांचा निधी वर्गणीतून जमा करून शाळेकडे जमा केला. जमा झालेल्या या निधीतून शाळेच्या भिंतीचे प्लॉस्टर, विजजोडणी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अत्यंत जुने झालेले बाकडे, डायनिंग टेबल, चपल बुट स्टॅन्ड व शाळेला रंगरंगोटी असे काम हाती घेतले जाणार आहेत.
10 वी पास अन् पगार 46000 हून अधिक! RBI ची ऑफिस अटेंडंट पदांसाठी भरतीची घोषणा
शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी अप्रगत वर्गाचे नियोजन केल्यामुळे शाळेच्या गुणवत्तेत बराच बदल झाला आहे. शिष्यवृत्ती परिक्षामध्ये विद्यार्थी जास्तीचे पात्र व्हावेत यासाठी रविवारीसुद्धा तासिकेचे नियोजन केले जाते. परिणामी गुणवत्तेत प्रगती होत आहे. शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्यात दोन दिवस मोबाईल व टिव्हीचा उपवास राबवला जातो.
शाळेत ग्रंथालय, परसबाग, डिजिटल बोर्ड, ओव्हर हेड प्रोटेक्ट, मैदान अशी सुविधांमुळे शाळेची गुणवत्ता वाढीस लागली आहे. शाळा सुरू होण्याअगोदरच शाळा परिसराची स्वच्छता केली जाते. परिपाठात अनुपस्थित विद्यार्थ्याच्या पालकांना फोनवरून विचारणा केली जात असल्याने विद्यार्थी उपस्थिती वाढली आहे. या उपक्रमांमुळे शाळेची पटसंख्या वाढत असुन पुढील शैक्षणिक वर्षात यात आणखी वाढ होण्याची खात्री शिक्षकांना आहे. पुढील शैक्षणिक वर्षात शाळेत ८वी चा वर्ग सुरू करण्याचा शाळेचा मानस आहे.
शाळाविकास करण्यासाठी शिक्षकांच्या प्रयत्नांना पालकांचे कायम सहकार्य असेल, असा विश्वासही पालकांनी शिक्षकांना दिला. विद्यार्थी संख्या आणखी कशी वाढेल
यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शाळाचे मुख्याध्यापक रंजित राठोड, कैलास पवार, तुषार गवई, मिनाक्षी ढोले यांना केलेल्या मार्गदर्शनानुसार शिक्षक प्रयत्नशील आहेत.