Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

B R Harne College : 40 गुणांची परीक्षा ठरली वादग्रस्त; आता 50 गुणांमध्ये रूपांतर करून निकाल होणार जाहीर

B.R. Harne College of Physiotherapy : ठाण्यातील बी. आर. हरणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार 50 गुणांची अंतर्गत परीक्षा घेणे बंधनकारक असताना महाविद्यालयाने 40 गुणांची परीक्षा घेतल्याचा प्रकार समोर आला होता. या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 30, 2026 | 06:01 PM
40 गुणांची परीक्षा ठरली वादग्रस्त; आता 50 गुणांमध्ये रूपांतर करून निकाल जाहीर होणार; हरणे महाविद्यालयाच्या परीक्षा गोंधळावर विद्यापीठाचा निर्णय

40 गुणांची परीक्षा ठरली वादग्रस्त; आता 50 गुणांमध्ये रूपांतर करून निकाल जाहीर होणार; हरणे महाविद्यालयाच्या परीक्षा गोंधळावर विद्यापीठाचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • 40 गुणांची परीक्षा ठरली वादग्रस्त
  • आता 50 गुणांमध्ये रूपांतर करून निकाल होणार जाहीर
  • हरणे महाविद्यालयाच्या परीक्षा गोंधळावर विद्यापीठाचा निर्णय
नीता परब, मुंबई : ठाणे जिल्हास्थित बी. आर. हरणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार आंतरिक परीक्षा पन्नास गुणांची घेणे बंधनकारक होते. परंतु काही दिवसांपूर्वी हरणे महाविद्यालयाने पन्नास गुणांऐवजी चाळीस गुणांची आंतरिक परीक्षा घेतल्याचा धक्कादायक बाब समोर आली होती. महाविद्यालयाने घेतलेल्या चुकीच्या परीक्षा पद्धतीमुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना नाहक फटका बसला होता. पण दरम्याच्या काळात पालक व विद्यार्थ्यांनी शिवसेनेकडे धाव घेत चुकीचा प्रकार निदर्शनास आणला, त्यांनतर शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत चाळीस गुणांना पन्नास गुणांमध्ये रूपांतरित करून सर्व निकाल एका दिवसात जाहीर करण्याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक आरटी-पीसीआर प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम! आरोग्य क्षेत्रासाठी कौशल्यांचे बळ

बी. आर. हरणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कॉलेजकडून विद्यार्थांची फसवणूक

बी.आर. हरणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाने आंतरिक परीक्षा पन्नास गुणांची घेणे बंधनकारक होते. परंतु हरणे महाविद्यालयाने पन्नास गुणांऐवजी चाळीस गुणांची आंतरिक परीक्षा घेतल्याचा चुकीचा प्रकार काही दिवसापूर्वी घडला. दरम्यान महाविद्यालयाने केलेल्या चुकीची कल्पना विद्यापीठाने निदर्शनास आणून दिल्यानंतर महाविद्यालयाने पन्नास गुणांची खोटी प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडे सादर करून चुकीचे गुण पण विद्यापीठाला सादर केले. या सर्व प्रकारामुळे विद्यापीठाने जवळपास सहा ते सात महिने निकाल राखून ठेवला. सहा महिन्यानंतर फक्त पस्तीस विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला. प्रत्यक्षात चाळीस गुणांची उत्तरपत्रिका असताना पन्नास गुणांची दाखवून विद्यापीठ व विद्यार्थी यांची फसवणूक हरणे महाविद्यालयाने केल्याचा आरोप शिवेसेनेच्या पाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यावी लागणार होती. विद्यार्थ्यांसोबत पालकांतमध्येही नैराश्य व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पण विद्यार्थी व पालकांनी शिवसेना आमदार राजेश मोरे ह्यांच्या सहकार्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे धाव घेत समस्या सोडविण्याबाबत पत्रव्यवहार केला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ :सर्व निकाल एका दिवसात जाहीर करण्याचा निर्णय

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव ॲड. वैभव थोरात यांनी त्वरित विद्यार्थी व पालकांसोबत नाशिक येथे जाऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ-परीक्षा विभागाचे परीक्षा नियंत्रक डॉ. सीताराम कडू यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. महाविद्यालयाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना पडू नये यासाठी चाळीस गुणांना पन्नास गुणांमध्ये रूपांतरित करून सर्व निकाल एका दिवसात जाहीर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच महाविद्यालयाने केलेल्या चुकीबद्दल कडक कारवाई करण्याची आश्वासनही डॉ.सीताराम कडू यांनी शिवसेना सचिव वैभव थोरात व विद्यार्थ्यांना दिले. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर दिव्या जेठवानी उपस्थित होत्या.

Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये १,५२४ जागांची मेगाभरती; १० वी, आयटीआय आणि पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!

Web Title: Br harane college physiotherapy internal exam controversy muhs relief for students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • College
  • education
  • maharashtra

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात
1

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
2

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस
3

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा
4

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.