गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा
Ganeshotsav 2026: १४ सप्टेंबर पासून गणेश चतुर्थी सणाला सुरुवात झाली आहे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरणात असते. बाप्पाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. ११ दिवस बाप्पाची मनोभावे पूजा करून घरात वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य सुद्धा बनवला जातो. बाप्पाच्या नैवेद्यात प्रामुख्याने उकडीचे मोदक किंवा मोदकांचे विविध प्रकार बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केशर हलवा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला केशर हलवा चवीला अतिशय सुंदर लागेल. तुपाचा वापर करून बनवलेला केशर हलवा खाल्ल्यानंतर सगळेच तुमचं कौतुक करतील. हा पदार्थ १५ ते २० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. त्यामुळे बाप्पाच्या नैवेद्यात वेगवेगळे पदार्थ बनवावेत. चला तर जाणून घेऊया केशर हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






