दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर (फोटो सौजन्य-X)
CBSE Board Exam 2025 News In Marathi: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वीच्या 2025 च्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर विद्यार्थी त्यांची डेटशीट तपासू शकतात. तुम्ही डेटाशीट सहजपणे डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या थेट लिंकचा देखील वापर करू शकता.
आधी CBSE बोर्डाने म्हटल्याप्रमाणे आणि आता जाहीर केलेल्या डेटशीटनुसार, CBSE बोर्डाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि पहिला पेपर शारीरिक शिक्षणाचा असेल. तर 10वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 रोजी सुरु होणार असून पहिला पेपर इंग्रजी या विषयाचा आहे. यावेळी सीबीएसईने गेल्या काही वर्षांची परंपरा मोडून प्रथम प्रमुख विषयांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच १५ फेब्रुवारी २०२५ पासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे. इयत्ता 10वीची परीक्षा १८ मार्चला तर,12वीची परीक्षा ४ एप्रिलला संपणार आहे. सीबीएसई 10वी,12वीच्या परीक्षेचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होतील आणि दुपारी १.३० वाजता संपतील. सीबीएसईने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकरच म्हणजे २३ दिवस आधी प्रसिद्ध केले आहे.
CBSE बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक वर दिलेल्या लिंकवरून किंवा अधिकृत वेबसाइटवरून डेटशीटची PDF आवृत्ती डाउनलोड करू शकतात. विद्यार्थ्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित करून आतापासूनच त्यांच्या परीक्षेची तयारी सुरू करावी असा सल्ला देण्यात आला आहे. नवीनतम अद्यतनांसाठी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in तपासत रहा.
यंदा सीबीएसई बोर्ड परीक्षा 2025 भारतातील 8,000 शाळांसह 26 परदेशी देशांतील 44 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणार आहे. या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 75% उपस्थिती आवश्यक असेल.