Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Three Language Policy: सीबीएसईच्या त्रि-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; इंग्रजीच्या स्थितीवरही उपस्थित झाला प्रश्न

CBSE Three Language Policy: CBSE च्या त्रि-भाषा धोरणाबाबत पुढील सुनावणी १७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. यादरम्यान केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या मुद्द्यावर स्थिती स्पष्ट केली जाऊ शकते.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 10, 2026 | 09:52 AM
three language policy

three language policy

Follow Us
Follow Us:

CBSE Three Language Policy:  CBSE च्या त्रि-भाषा धोरणाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा देण्याबाबत विचार करण्यास सांगितले. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सध्याच्या व्यवस्थेनुसार या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन इयत्ता १० वी मध्ये तिसऱ्या भाषेची परीक्षा द्यावी लागू शकते. न्यायालयाने या मुद्द्यावर केंद्राची बाजू ऐकून घेतली असून पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना किमान इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देण्याचा विचार करण्यास सांगितले. न्यायालयाने म्हटले की, या विद्यार्थ्यांना जानेवारीतच पुढील वर्गात बढती देण्यात आली आहे. अशा स्थितीत नवीन भाषा धोरणांतर्गत त्यांना कसे सामावून घेता येईल, या शक्यतेवर विचार केला जाऊ शकतो.

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण कसे पोहोचले?

२०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वी ते ९ वी पर्यंत तिसरी भाषा अनिवार्य करणाऱ्या CBSE च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या निर्णयाविरुद्ध अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याच याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?

याचिकाकर्त्यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन आणि आनंद ग्रोवर यांनी लवकरात लवकर सुनावणीची मागणी केली. त्यांनी सांगितले की, पालक या धोरणाबाबत चिंतेत आहेत आणि विद्यार्थ्यांना परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. वकिलांनी पुढील आठवड्यात प्रकरणाची सुनावणी घेण्याची विनंती केली, तसेच यानंतर प्रकरण आणखी लांबणीवर टाकू नये, असे म्हटले.

Walk-in Interview 2026: नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

इंग्रजीबाबत काय प्रश्न उपस्थित झाला?

सर्वोच्च न्यायालयाने त्रि-भाषा धोरणातील इंग्रजीच्या स्थितीबद्दलही प्रश्न उपस्थित केला. इंग्रजीला मातृभाषा मानायचे की परदेशी भाषा? असा सवाल पिठाने केला. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, ते दिलासा देण्याच्या मुद्द्यावर त्याच दिवशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

सरकारचे उत्तर काय होते?

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, ते इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांशी बोलतील. म्हणजेच सध्या सरकारकडून कोणताही अंतिम निर्णय समोर आलेला नाही. या प्रकरणात केंद्राच्या पुढील पावलावर सर्वांचे लक्ष असणार आहे.

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

पुढील सुनावणी कधी होणार?

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ सप्टेंबर २०२६ रोजी निश्चित केली आहे. यादरम्यान केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या मुद्द्यावर स्थिती स्पष्ट केली जाऊ शकते. तूर्तास त्रि-भाषा धोरणाबाबतच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असून विद्यार्थी आणि पालकांना न्यायालयाच्या पुढील सुनावणीची वाट पाहावी लागेल.

Web Title: Cbse three language policy supreme court hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • CBSE
  • education
  • language
  • Suprim court

संबंधित बातम्या

AI Impact on Education: अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अतिवापर पडतोय महागात; OECD च्या अहवालात मोठा खुलासा!
1

AI Impact on Education: अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अतिवापर पडतोय महागात; OECD च्या अहवालात मोठा खुलासा!

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
2

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
3

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
4

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.