Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ch. Sambhajinagar : भेदभावमुक्त शिक्षणासाठी आंबेडकरी संघटनांचा एल्गार; कोर्टाने अन्याय केल्याचा आंदोलकांचा आरोप

शैक्षणिक क्षेत्रातील जात, धर्म, भाषा, लिंग आधारित भेदभावाला प्रतिबंध करण्यासाठी विद्यापीठ आयोगाने प्रस्तावित केलेल्या युजीसी इक्विटी रेग्युलेशन या नियमावलीला सवर्ण समाजाच्या विरोधावरून सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 02, 2026 | 03:31 PM
Ch. Sambhajinagar : भेदभावमुक्त शिक्षणासाठी आंबेडकरी संघटनांचा एल्गार; कोर्टाने अन्याय केल्याचा आंदोलकांचा आरोप
Follow Us
Follow Us:
  • भेदभावमुक्त शिक्षणासाठी आंबेडकरी संघटनांचा एल्गार;
  • कोर्टाने अन्याय केल्याचा आंदोलकांचा आरोप
छ. संभाजीनगर : शैक्षणिक क्षेत्रातील जात, धर्म, भाषा, लिंग आधारित भेदभावाला प्रतिबंध करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रस्तावित केलेल्या युजीसी इक्विटी रेग्युलेशन या नियमावलीला सवर्ण समाजाच्या विरोधावरून सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याचकारणाने देशभरात संतापाची लाट उसळली. यापार्श्वभूमीवर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथे विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी जोरदार आंदोलन करून या स्थगितीचा निषेध नोंदविला.

यावेळी नवीन नियमावली तात्काळ बनविण्यात येऊन लागू करावी, तिला अधिक सशक्त व सर्वसमावेशक बनवावे तसेच समताविरोधी उच्चवर्णीय गटाचा दबाव झुगारून न्यायालयाने निष्पक्षपणे न्याय करावा अशी मागणी करून “भेदभावमुक्त शिक्षण हा आमचा हक्क आहे”, युजीसी समता नियमावली तात्काळ लागू करा”, जातीय भेदभाव थांबवाअशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव, संस्थात्मक छळ आणि मानसिक अत्याचार ही गंभीर व वास्तव समस्या असून रोहित वेमुला व डॉ. पायल तडवी यांसारख्या घटना त्याचे जिवंत पुरावे आहेत. प्रवेश प्रक्रिया, मूल्यमापन, संशोधन मार्गदर्शन, फेलोशिप वितरण, प्रशासकीय निर्णय व शिस्तभंग कारवाईपर्यंत भेदभाव खोलवर रुजलेला आहे. अशा परिस्थितीत समतेवर आधारित बंधनकारक नियमावली ही काळाची गरज असताना या नियमावलीला स्थगिती आणि काही उच्चवर्णीय गटांकडून होणाऱ्या विरोधाचा तीव्र निषेध केला.

JEE टॉपरसाठी IIT सीएसई ही पहिली पसंत का असते? टॉप इन्स्टिट्यूटचे ओपनिंग आणि क्लोजिंग रँक जाणून घ्या…

कोर्टाने केला अन्याय, आंदोलनातून निघाला सूर

समतेच्या मागणीला जातिवाद ठरवत कोटनि केलेला हा अन्याय असल्याचे सांगत याविरोधात तीव्र संघर्ष करण्याचा सर्वांनी निर्धार केला. यावेळी प्राचार्य सुनील वाकेकर, डॉ. शंकर अंभोरे, दौलतराव मोरे, डॉ. अनिल पांडे, सचिन निकम, डॉ. दीपक खिल्लारे, अरविंद कांबळे, चंद्रकांत रुपेकर, मिलिंद मोकळे, राहुल वडमारे, प्रा. सिद्धोधन मोरे, प्रा. देवानंद पवार, राष्ट्रपाल गवई, प्रा. सागर गायकवाड, राहुल गवळी, प्रवीण शिंदे, बाळू वाचमारे, मधुकर मघाडे, रुपराव खंदारे, शैलेंद्र मिसाळ, सुशील भिसे, प्रा प्रबोधन बनसोडे, कुणाल भालेराव, किरण मगरे, यश रोकडे, प्रशांत बोराडे, संदिप तुपसमुद्रे, लोकेश कांचळेशुभम नवगिरे, सचिनवाहुळे, बालाजी सोनवणे, रत्नदीप रगडे, सुमेधनरवडे, मंथन गजहंस, यश गजभिये, सिद्धार्थ दिवेकर, प्रमोद थोरात, अनिल जाधव, डॉ प्रकाशगायकवाड, सुमित खिल्लारे, सिद्धार्थ केदारे,आनंद केदारे, पोपट मुगदल, अशोक उके, गौतमखरात,अंकेश वाव्हळ,अॅड. सुशील पाईकराव, समाधान सावंत, शैलेशखंदारे, बाळू गायकवाड, विजय उमाळे, प्रदीपतेलंग, प्रकाश ढाले, अविनाश यादव, जीवनगायकवाड, सोहेल अन्सारी, काझी फराजआदींसह रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन विद्यार्थीसेना, बीआरएसपी सहभागी झाल्या होत्या.

अनोखा आंदोलन! ‘नटवर सर’ साठी 35 KM पायदळ मार्च; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Web Title: Ch sambhajinagar ambedkarite organizations protest for discrimination free education protesters allege that the court has done injustice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Educational News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर
1

डॉक्टरांसाठी मोठी बातमी! NEET PG ची उत्तरतालिका अन् निकाल ३० सप्टेंबरपूर्वी; ‘असा’ तपासा स्कोअर

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस
3

Tapovan School Food Controversy: मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्याला दंड; मीरा भाईंदरमधील तपोवन शाळेला पालिकेची नोटीस

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.