फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Dinvishesh 5 November: आज अल्हाज मौलाना घोसी शाह (रहमतुल्लाह अलैह) यांची जयंती आहे. हे भारतातील एक अत्यंत थोर आणि आदरणीय सुफी संत, थिऑसॉफिस्ट आणि महान विद्वान होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन सूफिवाद, आध्यात्मिक ज्ञान आणि मानवी कल्याणाच्या प्रसारासाठी समर्पित केले. त्यांनी इस्लामी तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि सूफी विचारांवर अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन करून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांचे विचार आणि उपदेश समाजातील सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणणारे आणि बंधुभाव वाढवणारे होते. हैदराबादसह देशभरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग असून, त्यांनी स्थापन केलेल्या सूफी परंपरेचा प्रभाव आजही कायम आहे. एकात्मता, शांतता आणि मानवतेची सेवा हाच मौलाना घोसी शाह यांच्या जीवनकार्याचा आणि शिकवणुकीचा मुख्य संदेश राहिला आहे.
1896 : पुण्यात डेक्कन सभेची स्थापना झाली
1918 : पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया आणि हंगेरीने, इटलीला शरणागती पत्करली.
1921 : जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.
1922 : प्रसिद्ध पिरॅमिडमधील राजा तुतनखामेनच्या समाधीचे मुख्य प्रवेशद्वार शोधण्यात यश.
1948 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेने संविधानाचा मसुदा सादर केला.
1980 : रोनाल्ड रेगन हे विद्यमान जिमी कार्टर यांचा पराभव करून अमेरिकेचे 40 वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
1996 : डॉ. श्रीराम लागू आणि सत्यदेव दुबे यांना कला गौरव प्रतिष्ठानतर्फे नाट्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2000 : हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.
2001 : हॅरी पॉटर आणि फिलॉसॉफर्स स्टोनचा प्रीमियर लंडनमध्ये झाला.
2008 : बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.
1618 : ‘औरंगजेब’ – मुघल सम्राट याचा जन्म. (मृत्यू : 3 मार्च 1707)
1845 : ‘वासुदेव बळवंत फडके’ – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 17 फेब्रुवारी 1883)
1871 : ‘शरदचंद्र रॉय’ – मानववंशशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1884 : ‘जमनालाल बजाज’ – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 फेब्रुवारी 1942)
1884 : ‘हॅरी फर्ग्युसन’ – ट्रॅक्टरचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 1960)
1894 : ‘अप्पासाहेब पटवर्धन’ – कोकणचे गांधी यांचा जन्म. (मृत्यू : 10 मार्च 1971)
1897 : ‘जानकी अम्माल’ – भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 फेब्रुवारी 1984)
1916 : ‘रुथ हँडलर’ – बार्बी बाहुलीच्या निर्मात्या यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 2002)
1925 : ‘ऋत्विक घटक’ – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 6 फेब्रुवारी 1976)
1929 : ‘जयकिशन डाह्याभाई पांचाळ’ – शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1971)
1929 : ‘शकुंतलादेवी’ – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला यांचा जन्म. (मृत्यू : 21 एप्रिल 2013)
1930 : ‘रंजीत रॉय चौधरी’ – भारतीय औषधीशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 ऑक्टोबर 2015)
1934 : ‘विजया मेहता’ – दिग्दर्शिका यांचा जन्म.
1945 : ‘गोपाळकृष्ण गांधी’ – भारतीय नागरी सेवक आणि मुत्सद्दी यांचा जन्म.
1945 : ‘एक्कडू श्रीनिवासन लक्ष्मीनरसिंहन’ – तेलंगणाचे आणि आंध्र प्रदेशचे पहिले राज्यपाल यांचा जन्म.
1950 : ‘निग पॉवेल’ – व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक यांचा जन्म.
1955 : ‘अल्हाज मौलाना घोसी शाह’ – भारतीय लेखक, कवी आणि विद्वान यांचा जन्म.
1965: ‘मिलिंद सोमण’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
1971 : ‘तब्बू’ – अभिनेत्री यांचा जन्म.
1986 : ‘सुहास गोपीनाथ’ – भारतीय उद्योजक यांचा जन्म.
1970 : ‘पं. शंभू महाराज’ – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक यांचे निधन.
1991 : ‘पुरुषोत्तम विश्वनाथ बापट’ – प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 जून 1894)
1992 : ‘जॉर्ज क्लाईन’ – मोटर-व्हीलचेअरचे निर्माते यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1904)
1995 : ‘यित्झॅक राबिन’ – इस्त्रायलचे 5 वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 1 मार्च 1922)
1998 : ‘नागार्जुन’ – हिंदी कवी यांचे निधन.
1999 : ‘माल्कम मार्शल’ – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 18 एप्रिल 1958)
2005 : ‘स. मा. गर्गे’ – इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार यांचे पुणे येथे निधन झाले.
2011 : ‘दिलीप परदेशी’ – नाटककार व साहित्यिक यांचे निधन.






