सौजन्य फोटो - AI Gemini
विमाननगरमधील ‘क्लाउड कार्टेल’ ( दुकान क्रमांक नऊ) नावाच्या दुकानात कॉस्मेटिक ज्वेलरीच्या नावाखाली आतमध्ये मोठा काळा बाजार सुरू होता. ही तरुणी दुकानाच्या आडून ई-सिगारेट, विविध फ्लेवरचे हुक्का आणि चक्क गांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती विमानतळ पोलीस ठाण्याच्या अंमलदार हरीप्रसाद पुंडे आणि लालू करहे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी दुकानावर अचानक छापा टाकला.
पोलिसांनी घेतलेल्या झडतीत दुकानात आणि दुकानाबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई-सिगारेट आणि तब्बल १३० ग्रॅम गांजा आढळून आला. हे दृश्य पाहून पोलिसही चक्रावले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकूण २ लाख १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात असे समोर आले आहे की, ही तरुणी यापूर्वी डेक्कन परिसरात दुकान चालवत होती आणि नंतर ते बंद करून तिने विमाननगरमध्ये हा धंदा सुरू केला होता. आयटी कंपन्यांमधील कर्मचारी आणि तरुण वर्गाला हे नशीली पदार्थ पुरवले जात होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फोनवरील ऑर्डर्स आणि पुरवठा साखळीचा (Supply Chain) शोध घेतला जात आहे.
Ans: कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानाच्या आडून ई-सिगारेट, हुक्का फ्लेवर आणि गांजा विकणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
Ans: पोलिसांनी 'क्लाउड कार्टेल' दुकानावर छापा टाकून १३० ग्रॅम गांजा, ई-सिगारेट, हुक्का फ्लेवर असा एकूण २ लाख १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
Ans: विमाननगर परिसरातील आयटी कंपन्या, नावाजलेली महाविद्यालये आणि तरुण वर्गाला लक्ष्य करून हा अवैध व्यवसाय सुरू होता.






