फोटो सौजन्य - social media
देशात ८ हजार इंजिनियरिंग कॉलेज आहेत, त्यातील ६ हजार कॉलेज खाजगी असून २ हजार सरकारी कॉलेज आहेत. दरवर्षी 20 लाखाहून अधिक विद्यार्थी JEE ची परीक्षा देतात. भारतातील टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी JEE परीक्षा द्यावी लागते. पण काही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हा नियम अनिवार्य नाही. येथे JEE व्यतिरिक्त इतर टेस्ट कोर्सच्या माध्यमातून पण ऍडमिशन घेता येते. देशातल्या टॉप इंजिनियरिंग इंस्टीट्युटमध्ये ऍडमिशन घेण्याअगोदर आईआईआरएफ रँकिंग आवर्जून बघितली पाहिजे. आईआईआरएफ रँकिंग, एक प्रकारची रँकिंग सिस्टम आहे ज्यात देशातील टॉप एज्युकेशनल इन्स्टिटयूट प्लेसमेंट परफॉर्मन्स, रिसर्च तसेच प्लेसमेंट स्टेटर्जीसारख्या अनेक मुद्यांच्या आधारे रँक केले जातात. देशातील टॉप इंजिनियरिंग कॉलेजांची रँकिंग iirfranking.com वर पाहता येते.
वर सांगितल्याप्रमाणे, देशात प्रत्येक टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये JEE परीक्षा गरजेची नाही. आईआईटी, एनआईटी, ट्रिपल आईटीसारख्या इंस्टीट्युटमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी JEE उत्तीर्ण करणे गरजेचे असते. देशातल्या टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे गूगल, अमेझॉन, टीसीएस, एचसीएलमध्ये जास्त पगाराची नोकरी लागण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हीही अशा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजच्या शोधात आहात तर तुमचा रिसर्च येथे जवळजवळ संपणार आहे.
देशातील टॉप १० इंजियनीयरिंग कॉलेजेस
मुंबईतील आईआईटी बॉम्बे भारतातील टॉप इन्स्टिटयूट आहे. आईआईटी बॉम्बेचा इंडेक्स स्कोर ९२० असून स्टेट रँक १ आहे. आईआईटी दिल्ली भारतात सेकंड टॉपला असून, इंडेक्स स्कोर ९१८.५८ आहे. चेन्नईतील आईआईटी मद्रास भारतात तिसऱ्या स्थानी आहे. आईआईटी मद्रासचा इंडेक्स नंबर ९१४.७ आहे. तसेच आईआईटी खड़गपुर, आईआईटी गुवाहाटी, आईआईटी कानपुर, आईआईटी रुड़की, आईआईटी बीएचयू, आईआईटी हैदराबाद, इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी क्रमशः भारतातील टॉप १० इंजिनियरिंग कॉलेजमध्ये येतात.
वरील कॉलेजेस देशात टॉप रँक करणारे इंजिनियरिंग इन्स्टिटयूटस आहेत. याचबरोबर मध्य प्रदेश मध्ये स्थित असलेले आईआईटी इंदौर, केरलमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ स्पेस साइंस एंड टेक्नोलॉजी, कानपुरमध्ये स्थित असलेले एचबीटीयू, पंजाबचा आईआईटी रोपर आणि दिल्लीत स्थित असलेले नेताजी सुभाष यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीदेखील भारतातील प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहेत.