भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट (फोटो- सोशल मीडिया)
मिडल ईस्ट युद्ध सुरू असताना भारत पाक सीमेवर हाय अलर्ट
पंजाबमध्ये बीएसएफचे जवान अलर्ट मोडवर
पाकिस्तानी घुसखोराला केली अटक
सध्या मिडल ईस्ट भागात इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिकेने युद्ध पुकारले आहे. इराणवर अमेरिका, इस्त्रायल जोरदार हल्ले करत आहे. इराणने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून भारताविरुद्ध नापाक कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने ही सावधगिरी बाळगली जात आहे.
युद्ध सुरू असताना भारत पाक सीमेवर हाय अलर्ट दिला गेला आहे. पंजाब सीमेवर बीएफएफ जवान सतर्क झाले आहेत. अमृतसर सेक्टरमध्ये रात्री उशिरा सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. पाकिस्तानी घुसखोराला अटक करण्यात आली आहे. बीएफएफ जवानांनी ही कारवाई केली आहे.
अटक करण्यात आलेल्या घुसखोरची चौकशी केली असतं तो पाकिस्तानचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तपासणी केली असतां पाकिस्तान रक्कम, मोबाइल आणि तीन सिमकार्ड जप्त केले गेले आहेत. घुसखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय सीमेत त्याने घुसखोरी का केली आणि त्याचा उद्देश काय होता याचा तपास केला जात आहे.
Israel Iran War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं काउंटडाऊन सुरु? इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर आता मोजतबा खामेनेई, जगात खळबळ
भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’
मध्यपूर्वेतील युद्धाची आग आता दक्षिण आशियाच्या दिशेने वळत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या चार दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या शेजारी श्रीलंकेच्या समुद्रात इराणचा मोठा गेम झाला आहे. इराणची विनाशकारी युद्धनौका समुद्रात बुडाली आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली असून हा इराणला दक्षिण आशियात मोठा झटका मानला जात आहे.
US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेराथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (04 मार्च 2026) पहाटे पाचच्या सुमारास IRIS Dena या जहाजाकडून त्यांना आपत्कालीन संदेश मिळाला होता. हे जहाज श्रीलंकेच्या दक्षिणेकडे गाले बंदापासून 40 नॉटिकल मैल अंतरावर बुडाले असल्याचे म्हटले आहे. माहिती मिळताच श्रीलंकेची दोन बचाव जहाचजे आणि हवाई दलाचे एक विमान तातडीने दाखल झाले होते. जहाजावर एकूण 180 कर्मचारी होती, यातील 30 जणांनाच वाचवण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.






