फोटो सौजन्य - Social Media
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA), व अन्य संरक्षण मंत्रालयाशी संबंधित संस्थांमध्ये (WESEE, CME, AFMC यासह) Scientist ‘B’ पदासाठी 152 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती Group ‘A’ Gazetted श्रेणीत येणारी असून ती Defence Research & Development Service (DRDS) अंतर्गत घेतली जाते. भरती प्रक्रियेचे सर्व अर्ज https://rac.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जातील. Employment News मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 21 दिवसांत अर्ज प्रक्रिया संपणार आहे. शैक्षणिक अर्हता व पदसंख्या यामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन (40), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (34), कम्प्युटर सायन्स (33), इलेक्ट्रिकल (7), मेटलर्जिकल/मटेरियल (5), केमिकल (3), सिव्हिल (1), एरोस्पेस/एरोनॉटिकल (6), बायोमेडिकल (2) या शाखांसाठी B.E./B.Tech आवश्यक आहे. तर, फिजिक्स (4), केमिस्ट्री (3), मॅथेमॅटिक्स (3), एंटोमॉलॉजी (1), बायोस्टॅटिस्टिक्स (1), सायकॉलॉजी (3), क्लिनिकल सायकॉलॉजी (1) या पदांसाठी संबंधित विषयातील M.Sc./M.A. पदवी लागते.
निवड प्रक्रिया ही GATE स्कोअरच्या आधारे (1:10 प्रमाणात) शॉर्टलिस्टिंगवर आधारित आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड GATE स्कोअरला 80% आणि मुलाखतीला 20% गुण देऊन केली जाईल. मुलाखतीसाठी किमान पात्रता गुणसिमा सामान्य प्रवर्गासाठी 70% आणि इतर सर्व आरक्षित प्रवर्गासाठी 60% आहे. महत्त्वाच्या तारखांमध्ये, भरती जाहिरात 21 मे 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 जून 2025 पासून सुरू होईल आणि 27 जून 2025 ही अंतिम तारीख असेल.
वयोमर्यादा UR/EWS उमेदवारांसाठी 35 वर्षे, OBC (NCL) साठी 38 वर्षे, SC/ST साठी 40 वर्षे आणि PwBD उमेदवारांसाठी 10 वर्षांची अतिरिक्त सवलत आहे. पगार व सुविधांबाबत, Scientist B पदासाठी लेव्हल-10 प्रमाणे ₹56,100/- इतका मूलभूत पगार असून, HRA आणि इतर भत्त्यांसह मासिक एकूण वेतन अंदाजे ₹1,00,000/- (मेट्रो शहरांमध्ये) इतके मिळेल.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम https://rac.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे. त्यानंतर आपला ईमेल आणि मोबाइल क्रमांक नोंदवावा. त्यानंतर अर्ज फॉर्म भरून, आवश्यक कागदपत्रे (पदवी प्रमाणपत्र, GATE स्कोअरकार्ड, छायाचित्र, स्वाक्षरी, आरक्षण प्रमाणपत्रे इत्यादी) अपलोड करून अर्ज सबमिट व लॉक करावा. अर्ज शुल्क UR/OBC/EWS पुरुष उमेदवारांसाठी ₹100/- आहे, तर SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. ही भरती विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ताबडतोब भरतीच्या प्रक्रियेस सुरुवात करावी आणि अर्ज करावा.