फोटो सौजन्य - Social Media
गोव्यात Goa Staff Selection Commission कडून विविध पदांसाठी भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. फॉरेस्ट ऑफिसर, प्लाटून कमांडर, राउंड फॉरेस्टर यांसह विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अधिकृत अधिसूचनेची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. मुळात, जे उमेदवार राज्याबाहेर काम करू इच्छुक आहेत किंवा गोव्यासारख्या निसर्गमय राज्यात निसर्गाचा आनंद घेत करिअर घडवू पाहत आहेत तर त्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. आता इच्छुक उमेदवार GSSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे.
कोण करू शकतात अर्ज?
विविध पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. ते जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनाचा लाभ घेण्यात यावा. उमेदवारांचे कमाल वय 25, 28, 30, 35 आणि 45 वर्षे असे पदानुसार ठरवले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता देखील पदानुसार ठरवण्यात आली आहे. उमेदवारांनी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच काही पदांसाठी पदवी आणि इतर आवश्यक पात्रताही असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड CBT-1 आणि CBT-2 परीक्षांच्या आधारे केली जाईल. CBT-1 परीक्षेत 75 मिनिटांत 60 गुणांचे प्रश्न सोडवावे लागतील. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना CBT-2 साठी बोलावले जाईल. CBT-2 परीक्षेत 80 गुणांचे प्रश्न असतील. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे.
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 45% गुण, OBC उमेदवारांना 40% गुण आणि SC/ST उमेदवारांना 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज (Registration Process)
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. खालील स्टेप्सनुसार अर्ज करता येईल:






