Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Educational News: शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला अन् कार्यशिक्षणाची पुस्तके अनिवार्य; ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करण्यात आली आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 19, 2026 | 04:26 PM
Education News, School News, Pune News, Balbharati,

Education News, School News, Pune News, Balbharati,

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके लागू.
  • इयत्ता ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी नवी पाठ्यपुस्तके बंधनकारक.
  • शारीरिक शिक्षण, कलाशिक्षण, कार्यशिक्षण व व्यावसायिक शिक्षणाचा समावेश.
सोनाजी गाढवे,  NEP 2020 Maharashtra Implementation: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यातील शालेय अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांची नव्याने प्रकाशित करण्यात आलेली पाठ्यपुस्तके आता अनिवार्यपणे वापरावी लागणार आहेत.

राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये या पाठ्यपुस्तकांचा वापर करण्याच्या सूचना शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्रात ‘धर्मस्वातंत्र्य कायदा’ लागू; फसवून धर्मांतर केल्यास ७ वर्षां

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यापैकी तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण आणि कलाशिक्षण, तर सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, व्यावसायिक शिक्षण आणि कलाशिक्षण या विषयांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

– काही ‘ई-बालभारती’च्या संकेतस्थळावर

मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) विभागीय भांडारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी या अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांचा नियमित वापर करावा, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली माध्यमांसाठी संबंधित पाठ्यपुस्तके ‘ई-बालभारती’च्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

Maharashtra Politics: मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार! महायुती सरकारच्या नव्या नियमावलीने मंत्रिमंडळात खळबळ

आठवड्याचे तासही निश्चित

शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांसाठी आठवडानिहाय तासिका आणि वेळापत्रक यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या विषयांचे केवळ पुस्तक उपलब्ध करून देणे नव्हे, तर नियोजित वेळापत्रकानुसार अध्यापन करणे अपेक्षित आहे.

कोणत्या शाळांना लागू?

राज्यातील राज्य मंडळाशी संबंधित शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खासगी अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळांमधील इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये आवश्यक कार्यवाही करून या पाठ्यपुस्तकांचा वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

Web Title: Education newsmaharashtra makes physical education and arts books mandatory for class 3 4 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • balbharati
  • education news
  • Maharashtra school
  • pune news
  • School news

संबंधित बातम्या

पुण्यातील वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार? डिसेंबरपर्यंत 4 ते 5 नवे पूल होणार
1

पुण्यातील वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार? डिसेंबरपर्यंत 4 ते 5 नवे पूल होणार

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा
2

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान
3

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा
4

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.