Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maha TET च्या पात्र उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्रे कधी मिळणार? वाचा सविस्तर…

परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयांकडे तसेच मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 15, 2026 | 05:55 PM
Maha TET च्या पात्र उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्रे कधी मिळणार? वाचा सविस्तर…
Follow Us
Follow Us:

पात्र उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांची माहिती
महाटीईटीचे आयोजन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ मधील पात्र उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्रांचे वितरण १८ मे ते ८ जून २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध केलेल्या (Career) सूचनेत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चे आयोजन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्रमांक १ (इयत्ता १ ली ते ५ वी स्तर) आणि पेपर क्रमांक २ (इयत्ता ६ वी ते ८ वी स्तर) यांचा अंतिम निकाल ३ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता.

परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयांकडे तसेच मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या अधिकृत http://www.mscepune.in संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अथवा मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रमाणपत्र स्वीकारताना उमेदवारांना महाटीईटी प्रवेशपत्राची प्रत, गुणपत्रिकेची प्रत, डी.टी.एड. किंवा बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.

महाराष्ट्र TET 2026 परीक्षा कधी होणार? कधीपर्यंत भरता येईल फॉर्म? जाणून घ्या

महाराष्ट्र TET 2026 परीक्षा कधी होणार?

राज्यातील शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ संदर्भात राज्य परीक्षा परिषदेकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा बंधनकारक असल्यामुळे हजारो उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू होणार असून १६ एप्रिल २०२६ पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी दिलेल्या कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी झालेल्या टीईटी परीक्षेत सुमारे ५० हजार उमेदवार पात्र ठरले होते. मात्र अजूनही अनेक उमेदवार पात्र होऊ शकले नसल्याने त्यांच्यासाठी ही पुन्हा एक संधी उपलब्ध झाली आहे.

Web Title: Eligibility certificates will be issued to eligible candidates of the maha tet career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Career News
  • TET
  • TET Exam

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
4

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.