Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र पोलिसांचा बिहारमध्ये छापा; टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र एसटीएफ आणि बिहार राज्यातील पोलिसांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. बिहारमधील वैशाली पोलिसांच्या मदतीने, ठाणे पोलिसांनी बुधवारी रात्री हाजीपूरमधील कचहरी रोडवर असलेल्या एका सायबर कॅफेवर छापा टाकला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 03, 2026 | 03:05 PM
महाराष्ट्र पोलिसांचा बिहारमध्ये छापा; टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र पोलिसांचा बिहारमध्ये छापा; टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

ठाणे : महाराष्ट्रात टीईटी पेपर फुटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी बिहारमधून तीन आरोपींना पकडले आहे. त्यामुळे प्रकरणाचा कसून तपास महाराष्ट्र पोलिस करत आहेत. त्यात आता महाराष्ट्र एसटीएफ आणि बिहार राज्यातील पोलिसांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. बिहारमधील वैशाली पोलिसांच्या मदतीने, ठाणे पोलिसांनी बुधवारी रात्री हाजीपूरमधील कचहरी रोडवर असलेल्या एका सायबर कॅफेवर छापा टाकला. या पथकाने रात्रभर कॅफेमध्ये तपास केला, अशी माहिती वैशाली पोलिसांनी दिली आहे.

 

भिवंडीत छापेमारी; बिहार, हरियाणापर्यंत धागेदोरे

टीईटी पेपरफुटीनंतर पोलिसांनी भिवंडीमध्ये छापेमारी केली. त्यातून या प्रकरणाचे बिहार आणि हरियाणात धागेदोरे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार बिहारमधून आणि हरियाणातून आरोपींना अटक करण्यात आले. आरोपींच्या चौकशीतून बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील बिजेंदर गुप्ताचे नाव समोर आले. तेव्हापासून महाराष्ट्र एसटीएफ पथक विविध राज्यांमध्ये छापेमारी करत आहे.

बिजेंदर गुप्ताचा शोध, पत्नीला केली अटक

बिजेंद्र गुप्ताच्या शोधात महाराष्ट्र एसटीएफ पथक बिहारमध्येही दाखल झाले, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधाराचा शोध घेत असताना हे पथक समस्तीपूरमधील त्याच्या घरी तळ ठोकून आहे. दरम्यान, एसटीएफ पथकाने बिजेंद्र गुप्ताच्या पत्नीला पाटण्यात अटक केली असून तिची सध्या चौकशी सुरू आहे. टीईटी पेपरफुटीचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे एक पथक गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये आहे. वैशाली पोलिसांच्या सूत्रांनुसार, हाजीपूरमध्ये तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून महाराष्ट्र पोलीस सध्या त्या तिघांचीही चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा : बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला पुन्हा धमकी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांकडून तपास सुरू

महाराष्ट्र पोलिसांना सापडले पुरावे

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात महाराष्ट्र एसटीएफच्या पथकाला अनेक डिजिटल पुरावे सापडले आहेत. या पुराव्याची सखोल तपासणी केली जाईल. या कारवाईनंतर, महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, महाराष्ट्र टीईटी पेपरफुटीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. वैशाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १ वाजेपर्यंत चाललेल्या या छाप्यानंतर एसटीएफच्या पथकाने कॅफे मालक सोनू कुमारसह तिघांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र एसटीएफचे पथक सध्या या तिघांची चौकशी करत आहे. रात्रभर ठाणे पोलीस आणि वैशाली पोलिसांची पथक कचहरी रोडवरील सायबर कॅफेबाहेर तैनात होती.

सोनू इथे सायबर कॅफे चालवतो. गुरुवारी जेव्हा आम्ही दुकानावर पोहोचलो. तेव्हा आम्हाला समजले की तिथे छापा टाकला जात आहे. तपास पथकाने आम्हाला सोनू महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात सामील आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे, असे सांगितले. पोलिस माझ्या दुसऱ्या भावाचाही शोध घेत आहेत, तो पाटण्यात राहतो. – जितेंद्र कुमार, आरोपी सोनूचा भाऊ.

Web Title: The police have detained three individuals from bihar in connection with the tet paper leak case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Maharashtra Police
  • TET Exam

संबंधित बातम्या

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
1

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करा; मनसेचे सुहास निम्हण यांची मागणी
2

बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करा; मनसेचे सुहास निम्हण यांची मागणी

Independence Day Medals 2026: स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राचा बहुमान! ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर
3

Independence Day Medals 2026: स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राचा बहुमान! ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे
4

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.