फोटो सौजन्य- iStock
IBPS (Institute of Banking Personnel Selection ) द्वारे 14 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या स्पेशालिस्ट ऑफिसर्स (SO) मुख्य परीक्षा 2024 साठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. या परीक्षेला बसण्यास पात्र असलेले उमेदवार त्यांचे प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइट – ibps.in वरून डाउनलोड करू शकतात. जाणून घेऊया याबद्दल
IBPS SO मुख्य परीक्षा 2024 प्रवेशपत्र थेट लिंकवरून डाउनलोड करण्यासाठी
प्रवेशपत्रामध्ये तपासा खालील तपशील
उमेदवाराचे नाव
उमेदवाराचा फोटो
अर्ज क्रमांक
रोल नंबर
परीक्षेची तारीख, वेळ आणि शिफ्ट
परीक्षा केंद्र तपशील
उमेदवाराची स्वाक्षरी
IBPS SO परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना
परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी कागदपत्रे
श्रेणी
लिंग
IBPS SO Mains 2024 परीक्षेचे स्वरुप
६० गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा
कायदा अधिकारी, आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, मानव संसाधन अधिकारी आणि विपणन अधिकारी या पदांसाठी ऑनलाइन मुख्य परीक्षा ६० गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा असणार आहे.
राजभाषा अधिकारी पदासाठी दोन परीक्षा
राजभाषा अधिकारी पदासाठी मुख्य परीक्षेत वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक अशा दोन्ही परीक्षा असणार आहेत. ज्या ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. वस्तुनिष्ठ परीक्षा पूर्ण झाल्यानंतर लगेचच वर्णनात्मक परीक्षा घेण्यात येईल. वर्णनात्मक परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांची उत्तरे संगणकावर टाइप करावी लागतील. वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक चाचणीसाठी एकूण वेळ 1 तास असेल आणि एकूण गुण 60 असतील. वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक चाचण्यांच्या वेगवेगळ्या वेळा असतील.
चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्हे मार्किंग
वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी, त्या प्रश्नासाठी नियुक्त केलेल्या गुणांमधून एक चतुर्थांश (0.25) गुण वजा केले जातील, जे उमेदवाराच्या गुणांना समायोजित करेल. अनुत्तरीत प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
896 स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचा भाग म्हणून IBPS SO मुख्य परीक्षा 2024 ही 14 डिसेंबर 2024 रोजी नियोजित करण्यात आली आहे. या भरतीची प्रिलिम्स परीक्षा 9 नोव्हेंबर 2024 रोजी झाली आणि निकाल 3 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झाला.