Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिग्री तर सगळेच देतात, मग College, Institute आणि University मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

12 वी परीक्षा देली की मग प्रतिक्षा असते निकालाची आणि मग उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांसमोर प्रश्न उभा राहतो. पर्याय तर बरेच उपलब्ध असतात. अर्ज भरताना, विद्यापीठ, महाविद्यालय आणि संस्था यांच्या सगळ्यांमध्ये गोंधळ उडतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 27, 2026 | 03:05 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • तुम्ही ज्या संस्थेत प्रवेश घेत आहात, तिचा प्रकार समजून घेणं फार महत्त्वाचं
  • संस्था स्वतःच्या पदव्या देऊ शकते का?
  • एखाद्या प्रमुख विद्यापीठाशी संलग्न आहे का?
Difference Between Institute, College and University : बारावी परीक्षा देली की मग प्रतिक्षा असते निकालाची आणि मग उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांसमोर प्रश्न उभा राहतो तो उच्च शिक्षणासाठी कोणता पर्याय निवडायचा. पर्याय तर बरेच उपलब्ध असतात. अर्ज भरताना, विद्यापीठ, महाविद्यालय आणि संस्था यांच्या सगळ्यांमध्ये बराच गोंधळ उडतो. वरवर पाहता, त्या सारख्याच वाटू शकतात, कारण त्यांचे मुख्य कार्य शिक्षण देणे हेच तर आहे. पण तांत्रिक आणि प्रशासकीय स्तरांवर त्यांच्यात बराच फरक असतो. पदवी प्रदान करण्याचा अधिकार, अभ्यासक्रमांची विविधता आणि स्वायत्तता या बाबतीत या तिन्हींमध्ये फरक असतो. पण नेमका काय फरक असतो?
आज शिक्षणाची चौकट लक्षणीयरीत्या बदलली आहे. केवळ पारंपरिक पदव्याच नव्हे, तर कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमही आता प्रचलित आहेत. त्यामुळे, तुम्ही ज्या संस्थेत प्रवेश घेत आहात, तिचा प्रकार समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ती संस्था स्वतःच्या पदव्या देऊ शकते का? ती एखाद्या प्रमुख विद्यापीठाशी संलग्न आहे का? की ती केवळ एका विशिष्ट विषयात प्रशिक्षण देते? शिक्षणाबाबतचा योग्य निर्णय घेण्यासाठी या तिन्हींमधले बारकावे समजून घेणं तितकं आवश्यक आहे.

CTET उत्तीर्ण झाला नाहीत? तरीही तुम्ही शिक्षक बनू शकता, ‘हे’ आहेत पर्याय जाणून घ्या सविस्तर

विद्यापीठ, महाविद्यालय आणि संस्था यांमधील फरक

बारावी किंवा पदवीनंतर पुढील शिक्षणाबद्दल योग्य निर्णय घेणं सोपे नसते. त्यासाठी सखोल अभ्यास करणे आणि आपण ज्या संस्थेत प्रवेश घेत आहात, त्या संस्थेचे नेमकं काय ठिकाण आहे हे समजून घेणे आवश्यक असते.

विद्यापीठ म्हणजेच युनिव्हर्सिटी –  ज्ञानाचा विशाल महासागर

विद्यापीठ हे उच्च शिक्षणाचे सर्वात मोठे केंद्र आहे. स्वतःच्या पदव्या प्रदान करण्याचा कायदेशीर अधिकार असलेली ही एक स्वायत्त संस्था आहे, हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. एका विद्यापीठात कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा यांसारखे अनेक वेगवेगळे विभाग आणि अनेक महाविद्यालये असू शकतात. विद्यापीठे केवळ शिकवत नाहीत, तर संशोधनावरही भर देतात आणि पीएचडीसारख्या उच्च पदव्यादेखील प्रदान करतात.

कॉलेज विद्यापीठाची एक शाखा

महाविद्यालय ही सहसा विद्यापीठाचा एक भाग असतात. प्रत्येक महाविद्यालय एका विशिष्ट विद्यापीठाशी संलग्न असते. उदाहरणार्थ, दिल्ली विद्यापीठ हे एक विद्यापीठ आहे, तर मिरांडा हाऊस किंवा हिंदू कॉलेज ही संलग्न महाविद्यालये आहेत. महाविद्यालयाला स्वतःच्या पदव्या देण्याचा अधिकार नसतो. ते विद्यापीठाचा अभ्यासक्रम शिकवते आणि अखेरीस, पदवी विद्यापीठाच्या नावानेच प्रदान केली जाते. महाविद्यालये बहुतेकदा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करतात.

संस्था विशेष कौशल्य केंद्र

संस्था अनेकदा त्यांच्या विशेष शिक्षण क्षेत्रासाठी ओळखल्या जातात. आयआयटी ही अभियांत्रिकीसाठी किंवा आयआयएम हे व्यवस्थापनासाठी अशा संस्था या विद्यापीठाचा भाग असतीलच असे नाही; त्या स्वतंत्र असू शकतात. काहीवेळा, संस्था केवळ पदविका किंवा प्रमाणपत्रे देतात. पण त्यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला, तर त्या पदव्या देखील प्रदान करू शकतात. संस्थेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना एका विशिष्ट उद्योगासाठी तयार करणे हा असतो.

येथे उच्च शिक्षणही उपलब्ध आहे.

या तिघांव्यतिरिक्त, आणखी काही श्रेणी आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी:
अभिमत विद्यापीठ: यांना सरकारकडून विद्यापीठाचा दर्जा दिला जातो. ते स्वतःचे शुल्क आणि अभ्यासक्रम ठरवू शकतात.
पॉलिटेक्निक: येथे प्रामुख्याने तांत्रिक आणि प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते, जिथून विद्यार्थ्यांना डिप्लोमा मिळवून थेट नोकरी करता येते.
व्यावसायिक शाळा: या शाळा केवळ एखादे विशिष्ट कौशल्य जसं की प्लंबिंग, वेल्डिंग किंवा ग्राफिक डिझायनिंग यांसारखी कौशल्य शिकवण्यावर लक्ष केंद्रित करतात.

प्रवेश घेण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

जर तुम्ही बारावी किंवा पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ, संस्था किंवा महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा विचार करत असाल, तर ह्या महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात:
मान्यता तपासा: सर्वप्रथम, संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) किंवा AICTE कडून मान्यता मिळाली आहे की नाही हे तपासा. मान्यता नसलेल्या पदवीला भविष्यात काहीही किंमत नसते.
पदवी विरुद्ध पदविका: तुम्ही ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहात तो पदवी आहे की पदविका, हे स्पष्ट करा. जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल किंवा परदेशात शिक्षण घ्यायचे असेल, तर पदवीला प्राधान्य द्या.
संलग्नता: जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल, तर ते कोणत्या विद्यापीठाशी संलग्न आहे हे नक्की जाणून घ्या. तुमची अंतिम गुणपत्रिका त्याच विद्यापीठाच्या नावाने प्रसिद्ध होईल, त्यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा महत्त्वाची ठरते.
प्लेसमेंट आणि माजी विद्यार्थ्यांची माहिती: संस्थेच्या वेबसाइटवरील प्लेसमेंटच्या दाव्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर (जसे की लिंक्डइन) माजी विद्यार्थ्यांशी बोला आणि खरा अभिप्राय मिळवा.
विशेष अभ्यासक्रम निवडा: जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट कौशल्यात (जसे की कोडिंग किंवा डिझायनिंग) प्राविण्य मिळवायचे असेल, तर मोठ्या विद्यापीठाऐवजी त्या क्षेत्रातील विशेष संस्थेची निवड करा. तिथे तुम्हाला उत्तम व्यावहारिक ज्ञान आणि उद्योग क्षेत्राचा अनुभव मिळू शकतो.

Best Courses After 12th: 12 वी नंतर कोणात मार्ग निवडाल? हे ट्रेडिंग कोर्स ठरू शकतात जबरदस्त करिअर ऑप्शन्स

Web Title: Everyone grants degreesso what exactly is the difference between a college an institute and a university find out in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • 12th
  • Career
  • career guide
  • Career News
  • Exam
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

MHT-CET 2026: पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार
1

MHT-CET 2026: पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीतील प्रश्नोत्तरावर आजपासून आक्षेप नोंदविता येणार

मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाची आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह नवी शैक्षणिक झेप
2

मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाची आधुनिक भू-स्थानिक तंत्रज्ञानासह नवी शैक्षणिक झेप

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!
3

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!

मुंबई विद्यापीठात ‘RT-PCR’ आणि प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षणाला सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी
4

मुंबई विद्यापीठात ‘RT-PCR’ आणि प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षणाला सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.