Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी! वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती देण्याचे निर्देश हसन मुश्रीफ यांनी दिले. अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग प्रकल्पांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 15, 2026 | 06:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

परीक्षा काळात एसटी बससेवेचा बोजवारा; विद्यार्थ्यांची धावपळ, चौकशी कक्षही निष्क्रिय

या बैठकीत विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, निधी वितरण, मनुष्यबळाराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती देण्याचे निर्देश हसन मुश्रीफ यांनी दिले.

अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग प्रकल्पांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.ची उपलब्धता, तसेच आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. काही प्रकल्पांमध्ये कामांना वेग मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले, मात्र काही ठिकाणी अद्यापही कामांचा वेग समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामात होत असलेल्या विलंबाबाबत मंत्री मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारांवर तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले की, राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी ही वैद्यकीय महाविद्यालये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे केवळ बांधकाम पूर्ण करणेच नव्हे, तर ते गुणवत्तापूर्ण आणि दीर्घकालीन उपयोगी असेल याचीही खात्री करणे आवश्यक आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी निर्देश दिले.

यासोबतच रुग्णालयीन सुविधा अत्याधुनिक करण्यावरही भर देण्यात आला. आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृहे, प्राध्यापक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा यांची उभारणी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत असणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर संबंधित भागातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा त्यांच्या जवळच उपलब्ध होतील, तसेच स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळेल आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमध्ये मोठी सुधारणा होईल, असेही त्यांनी सांगितले.

CBSE 10th Result : 10वी निकाल 2026 जाहीर; 33% गुणांची अट, असा करा ऑनलाइन निकाल चेक

दरम्यान, राज्य सरकार आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून, भविष्यातही अशा प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल, असे संकेत या बैठकीतून देण्यात आले. राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळावी, हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, उपसचिव संदीप ढाकणे तसेच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पांची सद्यस्थिती सादर करत पुढील कामकाजाचे नियोजनही मांडले.

Web Title: Expedite the construction of government medical colleges in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Career
  • Hasan Mushrif

संबंधित बातम्या

SPJIMR PGPDM बॅच २८ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सुधारित अभ्यासक्रमासह सामाजिक नेतृत्व घडविण्यावर भर
1

SPJIMR PGPDM बॅच २८ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; सुधारित अभ्यासक्रमासह सामाजिक नेतृत्व घडविण्यावर भर

Gokul Milk : दूध भेसळविरोधी कारवाईचा गोकुळला फायदा? दररोज 2 लाख लिटर दुधाची अतिरिक्त मागणी; हसन मुश्रीफांचा दावा
2

Gokul Milk : दूध भेसळविरोधी कारवाईचा गोकुळला फायदा? दररोज 2 लाख लिटर दुधाची अतिरिक्त मागणी; हसन मुश्रीफांचा दावा

ग्लोबल स्कूल्स ग्रुपकडून १२ विद्यार्थ्यांना ‘ग्लोबल सिटिझन स्कॉलरशिप’; सिंगापूरमध्ये मोफत शिक्षणाची संधी
3

ग्लोबल स्कूल्स ग्रुपकडून १२ विद्यार्थ्यांना ‘ग्लोबल सिटिझन स्कॉलरशिप’; सिंगापूरमध्ये मोफत शिक्षणाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.