Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

First Governor of RBI : आरबीआयचे पहिले गव्हर्नर भारतीय नव्हते? ऑस्ट्रेलियन बँकरच्या हाती का होती भारताची सूत्रे?

First Governor of RBI Sir Osborne Smith: भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सर ऑस्बॉर्न स्मिथ यांचा इतिहास, त्यांचा पगार आणि ब्रिटिश सरकारशी झालेल्या वादाबद्दलची रंजक माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 04, 2026 | 01:46 PM
rbi

rbi

Follow Us
Follow Us:

First Governor of RBI Sir Osborne Smith: जेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि बँकिंग प्रणालीवर चर्चा होते. तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) उल्लेख नेहमीच प्रथम होतो. पण तुम्हाला माहिती आहे का ? आरबीआयचे पहिले गव्हर्नर हे भारतीय नव्हे तर ऑस्ट्रेलियन बँकर होते. चला तर मग जाणून घेऊया आरबीआयबद्दलची सविस्तर माहिती..

 आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते?

आरबीआयची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली. त्यावेळी सर ऑस्बॉर्न स्मिथ यांची पहिल्या गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आली. सर स्मिथ हे लहानपणापासूनच बँकिंग क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी बँक ऑफ न्यू ऑस्ट्रेलियामध्ये २० वर्ष सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी भारताच्या सर्वात मोठ्या बँकिंग प्रणालीपैकी एक मानल्या जाणाऱ्या इम्पीरियल बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय गव्हर्नर पदाची जबाबदारी संभाळली. यावेळी त्याच्या कार्याचे कौतुक भारतातच नव्हे तर ब्रिटिश राजवटीतही झाले. यावेळी त्याना ‘नाइट’ पदवी बहाल करण्यात आली.

पगार किती होता?

पगाराबद्दल बोलायचे झाल्यास त्यावेळच्या आरबीआय गव्हर्नरला दरमहा अंदाजे  २०,००० रू पगार मिळत असे. जी त्यावेळच्या काळातली सर्वात मोठी रक्कम मानली जात होती. तसेच पगाराव्यतिरिक्त त्यांना निवास, शासकीय वाहन, कर्मचारी वर्ग आणि यासारख्या आवश्यक सुविधा दिल्या जात होत्या. यावरूनच त्या पदाची प्रतिष्ठा दिसून येते.

Indian Students in USA:परदेशात शिक्षणाचं स्वप्न की एकटेपणाची शिक्षा? भारतीय विद्यार्थ्याचा व्हायरल व्हिडिओ काय सांगतो? एकदा बघाच..

ब्रिटिश सरकारशी मतभेद

सर ऑस्बॉर्न स्मिथ यांचा आरबीआय गव्हर्नर म्हणून कार्यकाळ अल्प होता. परंतु गव्हर्नर म्हणून त्याच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाची कामे पार पाडली. त्यांनी बँकिंग प्रणालीला योग्य दिशा देऊन त्याला मजबूत करण्याचे कार्य केले. जेणेकरून लोकांचा बँकेवर विश्वास बसेल. तसेच त्यांनी चलन प्रणालीची स्थिरता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे वित्तीय प्रणाली मजबूत होण्यास मदत झाली. परंतु काही मुद्द्यांवर ब्रिटिश सरकारशी मतभेद झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

Government Jobs for Typing Skills: केवळ टायपिंगच्या जोरावर मिळवता येईल का सरकारी नोकरी? पगार आणि संधींची तुम्हाला कल्पना आहे का?

आरबीआयचे महत्त्व आणि तिची सद्यस्थिती

आज आरबीआय भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. देशातील व्याजदर, महागाई कशी नियंत्रित करायची आणि बाजारात किती पैसा प्रवाहित करायचा? यासारखे महत्त्वाचे निर्णय आरबीआय घेत असल्याने तिला देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असेही म्हटले जाते. याव्यतिरिक्त देशातील सर्व बँकांवर देखरेख ठेवण्याचे आणि त्यांना नियमांचे पालन करण्यासाठीचे आदेश आरबीआय देते. इतकेच नव्हे तर आर्थिक स्थिरता राखण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका आरबीआय बजावते.

Web Title: First governor of rbi sir osborne smith history salary tenure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Bank
  • bank RBI

संबंधित बातम्या

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
1

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या
2

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या

Repo Rate च्या निर्णयापूर्वी RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक! बँकांकडून 3.93 लाख कोटी रुपये परत घेतले; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
3

Repo Rate च्या निर्णयापूर्वी RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक! बँकांकडून 3.93 लाख कोटी रुपये परत घेतले; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

RBI कडून मोठा इशारा! तुमचं Bank Account फ्रीज होऊ शकतं; ‘ही’ चूक करु नका, काय सांगतो नियम?
4

RBI कडून मोठा इशारा! तुमचं Bank Account फ्रीज होऊ शकतं; ‘ही’ चूक करु नका, काय सांगतो नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.