Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्याचा डंका! गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली ‘AI प्रयोगशाळा’; ग्रामीण मुले गिरवणार तंत्रज्ञानाचे धडे

शालेय शिक्षण विभागाने राज्यात महाएआय मिशन अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर निश्चित केलेल्या राज्यातील तीन शाळापैकी मराठवाडा विभागातून गणोरी या एकमेव शाळेची प्रकल्पासाठी निवड झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 09, 2026 | 03:48 PM
गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली 'AI प्रयोगशाळा'

गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली 'AI प्रयोगशाळा'

Follow Us
Follow Us:

 

  • मराठवाड्याचा डंका!
  • गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली ‘AI प्रयोगशाळा’
  • ग्रामीण मुले गिरवणार तंत्रज्ञानाचे धडे
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागातील पहिली एआय प्रयोगशाळा फुलंब्री तालुक्याच्या गणोरी येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेत साकारणार आहे. शालेय शिक्षण विभागाने राज्यात महाएआय मिशन अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर निश्चित केलेल्या राज्यातील तीन शाळापैकी मराठवाडा विभागातून गणोरी या एकमेव शाळेची प्रकल्पासाठी निवड झाली आहे.

या एआय प्रयोगशाळेत परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानात शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने समान संधी मिळणार आहे. महाराष्ट्र हे राज्य देशातील एआय हब म्हणून विकसित करण्याच्या शासनाच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. गणोरी शाळेसोबत उमरेड जिल्हा नागपूर आणि मावळ जिल्हा पुणे येथील दोन शाळांची देखील राज्यातून निवड झाली आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रक जारी केले आहे.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल आणि एचपी इंडिया यांच्या दरम्यान २० ऑक्टोबर २०२५ रोजी सामंजस्य करार झाला होता. या करारानंतर गणोरी शाळेच्या निवडीबाबत आयुक्त शिक्षण सचिंद्र प्रताप सिंह यांनी महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन परिषदेला याबाबत अवगत केले होते.

एचपी इंडिया फाउंडेशन च्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण, एआय आधारित प्रकल्प, संगणकीय शिक्षण यांची जबाबदारी लर्निंग लिंक्स या देशातील प्रतिष्ठित संस्थेला देण्यात आली आहे. एचपी फाउंडेशनचे नवीन चावला आणि लर्निंग लिंक्सच्या वतीने ऋतुपर्ण मतकर, प्रदिप रोकडे यांनी शाळेला भेट देऊन समाधान व्यक्त केले. अत्यंत आधुनिक स्वरूपाच्या या प्रयोगशाळेच्या उभारणीचे काम सध्या सुरू असून शैक्षणिक वर्षअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

इच्छा असूनही नोकरी सोडू शकत नाही? तुम्ही पण ‘Job Hugging’ चे बळी ठरला आहात का? नेमकं आहे तरी काय?

नव्या शैक्षणिक वर्षात गणोरी शाळा आणि परिसरातील विद्यार्थी नव्या प्रयोगशाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे गिरवणार आहेत. गणोरी प्रशालेच्या या निवडीकरिता विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ, शिक्षण सहसंचालक रवींद्र वाणी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक तथा विस्तार अधिकारी दिलीप शिरसाठ, विस्तार अधिकारी राजेश महाजन आदींचे शाळेचे मुख्याध्यापक अनिल प्र. देशमुख, शाळा समितीचे अध्यक्ष कैलास गायकवाड, समितीचे सर्व सदस्य व शिक्षक वृंद आणि पालकांनी आभार व्यक्त केले आहे. नव्या कार्य संधीसाठी विद्यार्थ्यांना तयार करणाऱ्या भविष्यवेधी शिक्षणाचा एआयचे अध्ययन हा भाग आहे. नवीन रचनात्मक विचार करून विद्यार्थी काही चौकटीबाहेरील प्रकल्प पूर्ण करू शकतील. मशीन लर्निंग आणि डेटा विश्लेषण यांची संधी शालेय जीवनातच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळत आहे, ही महत्त्वाची बाब आहे.

विद्यार्थ्यांच्या कौशल्याला चालना मिळणार

येत्या पाच वर्षात राज्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना महा एआय मिशन या प्रकल्पाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलची पायाभूत समज वाढवली जाणार आहे. या प्रकल्पाच्या प्रारंभी मराठवाडा विभागातून गणोरी येथील एकमेव शाळेची निवड झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करून समस्या सोडविण्याच्या कौशल्याला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतून भविष्यातील उदयोन्मुख तंत्रज्ञानाधारित नौकऱ्यासाठी सक्षम नागरिक घडविण्याचे उद्दिष्ट आहे.

कर्नाटकात 93 टक्के विद्यार्थ्यांनी निवडली ‘हिंदी’; इंग्रजी, कन्नडनंतर तिसरी भाषेला पसंती

Web Title: Ganori zp school first ai lab marathwada maha ai mission news updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • AI Hub
  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
1

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
2

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख
3

Chatrapati Sambhajinagar : सायबर फसवणुकीत मोठी वाढ; सहा महिन्यांत 4,093 तक्रारी दाख

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…
4

याला म्हणतात दहशत! तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या भीतीने हॉटेलचालकांनी स्वतःच सुरू केली तपासणी, तर काहींनी स्वतःहूनच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.