Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GATE 2027: गेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि परीक्षा पॅटर्न..

GATE 2027 Registration Started: आयआयटी मद्रासद्वारे आयोजित GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया २७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख, पात्रता आणि परीक्षेची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 27, 2026 | 03:11 PM
gate

gate

Follow Us
Follow Us:

GATE 2027 Registration Started: देशातील प्रतिष्ठित तांत्रिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे आणि अनेक सरकारी संस्थांमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘गेट २०२७’ ही एक महत्त्वाची संधी आहे. ‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग’ म्हणजेच गेट २०२७ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच २७ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू झाली आहे. यावर्षी या परीक्षेचे आयोजन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास’ कडून केले जात आहे. उमेदवार अधिकृत ‘GATE ऑनलाइन ॲप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टम’ पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.

गेट २०२७ साठी विना विलंब शुल्क अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवार ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लेट फीसह अर्ज करू शकतील. अर्जात सुधारणा करण्याची सुविधा १४ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उपलब्ध राहील. परीक्षा फेब्रुवारी २०२७ मध्ये वेगवेगळ्या दिवशी होणार असून, परीक्षेच्या तारखा ६, ७, १३, १४, २० आणि २१ फेब्रुवारी २०२७ अशा आहेत.

कोण करू शकते अर्ज?

गेट २०२७ मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला, विज्ञान, वाणिज्य किंवा संबंधित मान्यताप्राप्त पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, जे विद्यार्थी सध्या त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात किंवा त्यानंतरच्या वर्षात शिकत आहेत, ते देखील या परीक्षेसाठी पात्र आहेत. उमेदवार ठरवलेल्या नियमांनुसार एक किंवा दोन टेस्ट पेपर निवडू शकतात.

किती भरावी लागेल फी?

गेट २०२७ ची अर्ज फी उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे:

  • महिला उमेदवार आणि SC, ST तसेच PwD प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमित कालावधीत फी १,००० रुपये प्रति पेपर आहे.
  • इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २,००० रुपये प्रति पेपर निश्चित करण्यात आले आहे. लेट फीसह अर्ज केल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

कसा असेल परीक्षा पॅटर्न?

गेट २०२७ परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल. प्रश्नपत्रिकेत जनरल ॲप्टिट्यूडसह उमेदवाराने निवडलेल्या विषयावरील प्रश्न विचारले जातील. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न, मल्टिपल सिलेक्ट प्रश्न आणि न्यूमेरिकल अन्सर टाईप प्रश्न समाविष्ट असतील. प्रत्येक पेपर एकूण १०० गुणांचा असेल, ज्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूडचे १५ गुण असतील, तर उर्वरित गुण निवडलेल्या विषयाशी संबंधित असतील.

प्रश्नांची निगेटिव्ह मार्किंग कशी असेल?

MCQ प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यास निगेटिव्ह मार्किंग लागू होईल. एका गुणाच्या MCQ चे उत्तर चुकीचे असल्यास एक-तृतीयांश (1/3) गुण आणि दोन गुणांच्या MCQ चे उत्तर चुकीचे असल्यास दोन-तृतीयांश (2/3) गुण कापले जातील. तर MSQ आणि NAT प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यास कोणतीही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. परीक्षा देशातील विविध निर्धारित केंद्रांवर घेतली जाईल.

SSC CGL परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न पाहतायं? मग चुकूनही करू नका ‘या’ पाच चुका!

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. सर्वप्रथम उमेदवार GATE २०२७ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन GOAPS पोर्टल उघडावे.

2. त्यानंतर DigiLocker च्या मदतीने नवीन नोंदणी पूर्ण करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा.

3. अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरावी.

4. त्यानंतर अलीकडील फोटो आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करावीत.

5. उमेदवारांनी परीक्षा शहराचा पर्याय निवडून अर्ज शुल्काचा भरणा करावा.

6. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रत डाउनलोड करून किंवा प्रिंट काढून सुरक्षित ठेवावी.

GMC Sindhudurg Bharti 2026: सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदांसाठी आज थेट मुलाखत; २ लाखांपर्यंत मिळणार पगार!

गेट (GATE) स्कोरचा फायदा काय?

गेट स्कोरचा वापर उच्च शिक्षण आणि करिअरच्या अनेक संधींसाठी केला जातो. पात्र उमेदवार IITs आणि IISc सह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये पोस्ट ग्रॅजुएट स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी याचा वापर करू शकतात. याशिवाय काही सरकारी संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (PSUs) भरती प्रक्रियेत गेट स्कोरचा निकष म्हणून वापर करतात.

Web Title: Gate 2027 registration started iit madras exam dates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Exam
  • IIT

संबंधित बातम्या

FMGE Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन; जाणून घ्या नेमक्या काय आहेत उमेदवारांच्या मागण्या?
1

FMGE Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन; जाणून घ्या नेमक्या काय आहेत उमेदवारांच्या मागण्या?

MPSC Paper Leak: परीक्षा पुन्हा होणार! ६ आरोपी क्राइम ब्रँचच्या जाळ्यात; उमेदवारांना भरावा लागणार नाही अतिरिक्त शुल्क
2

MPSC Paper Leak: परीक्षा पुन्हा होणार! ६ आरोपी क्राइम ब्रँचच्या जाळ्यात; उमेदवारांना भरावा लागणार नाही अतिरिक्त शुल्क

BPSC Students Protest: पाटण्यात BPSC अभ्यर्थी रस्त्यावर; 15 विद्यार्थी संघटनांचा मोर्चा, पेपर लीकच्या चौकशीसह फेरपरीक्षेची मागणी
3

BPSC Students Protest: पाटण्यात BPSC अभ्यर्थी रस्त्यावर; 15 विद्यार्थी संघटनांचा मोर्चा, पेपर लीकच्या चौकशीसह फेरपरीक्षेची मागणी

Exam Result : मोठी बातमी! KVS आणि NVS भरतीचे टियर-2 निकाल जाहीर; ‘या’ स्टेप्सद्वारे तपासा निकाल!
4

Exam Result : मोठी बातमी! KVS आणि NVS भरतीचे टियर-2 निकाल जाहीर; ‘या’ स्टेप्सद्वारे तपासा निकाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.