Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत

स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क असतानाच गोवा विमानतळावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने परीक्षेत कॉपी केल्याचा संशय असलेल्या दोघांना सीआयएसएफने ताब्यात घेतले.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2026 | 03:43 PM
IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत

Follow Us
Follow Us:
  • गोवा विमानतळावर दोन संशयितांना अटक
  • ब्लूटूथ इअरपीस आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
  • दुसऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा दिल्याचाही संशय
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) स्पर्धा परीक्षेत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने कॉपी करणाऱ्या दोघांना पकडले, गोवा आयआयटीमध्ये बिगरशैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय सहायक पदासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत त्यांनी गैरप्रकार केल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे. पकडलेले दोघेही हरियाणातील जिंद जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांची नावे राकेश डाहोलिया (२९) आणि अंकित सिंह (२३) अशी आहेत. यापैकी एकाने दुसऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा दिल्याचे समोर आले आहे.

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २.२५ वाजता गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात चढण्यासाठी एका प्रवाशाने सुरक्षातपासणी केंद्रावर आपली बॅग एक्स-रे तपासणीसाठी ठेवली. यावेळी सीआयएसएफच्या कर्मचाऱ्याला बॅगेत संशयास्पद इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळल्या. त्यामुळे बॅगेची सखोल तपासणी करण्यात आली. त्यात परीक्षेत कॉपी करण्यासाठी वापरली जाणारी ३ अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, २ सिमकार्ड आणि ३ ब्लूटूथ इअरपीस सापडले. तसेच गोवा आयआयटीच्या भरती परीक्षेचे प्रवेशपत्रही मिळाले.

कॉपीसाठी उपकरणांचा वापर केल्याची कबुली

चौकशीदरम्यान, या उपकरणांचा परीक्षेत कॉपी करण्यासाठी वापर केल्याची कबुली प्रवाशाने दिली. त्याच्यासोबत प्रवास करणारा दुसरा साथीदार विमानात बसल्याची माहितीही त्याने सीआयएसएफला दिली. त्यानंतर विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्या प्रवाशाची ओळख पटवून त्याला विमानातून उतरवण्यात आले. त्याच्या बॅगेतही अशाच प्रकारची उपकरणे आणि सिमकार्ड आढळले. दोघांना पुढील तपासासाठी गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

दुसऱ्या उमेदवाराच्या जागी दिली परीक्षा

एका आरोपीने दुसऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा दिल्याचा दावा केला आहे. सुरक्षा तपासणीच्या प्रतीक्षालयात त्याने फेकलेली इतर व्यक्तीची ओळखपत्रेही जप्त करण्यात आली. आपण संरक्षण आस्थापनात कर्मचारी असल्याचा त्यांचा दावा असून, त्याचीही पडताळणी केली जात आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Goa airport two arrested iit recruitment exam cheating bluetooth devices cisf nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • crime news
  • Exam
  • Goa

संबंधित बातम्या

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार
1

Students Exam Fee: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क घेतल्यास थेट महाविद्यालयावर कारवाई होणार

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात
2

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं
3

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ
4

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.