फोटो सौजन्य - Social Media
इन्कम टॅक्स विभागाने 2025 साठी नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. MTS (मल्टी-टास्किंग स्टाफ), कर सहाय्यक (Tax Assistant) आणि शिपाई (Steno) पदांसाठी ही भरती होणार असून, एकूण 56 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया 15 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2025 आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे, कारण अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आणि निवड प्रक्रिया सोपी आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा MTS पदासाठी 18 ते 25 वर्षे आणि इतर पदांसाठी 18 ते 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. वयोमर्यादा गणनेची तारीख 1 जानेवारी 2025 आहे, तसेच शासकीय नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काही विशिष्ट क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असावा. त्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धा (National Championships), खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि शालेय क्रीडा महासंघाच्या स्पर्धा यांचा समावेश आहे. त्यामुळे विशेषतः क्रीडा क्षेत्रातील युवकांसाठी ही एक मोठी संधी आहे.
निवड प्रक्रियेमध्ये प्रथम अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर, कर सहाय्यक पदासाठी टायपिंग टेस्ट आणि शिपाई पदासाठी स्टेनो टेस्ट घेतली जाईल. या चाचण्यांनंतर, निवड झालेल्या उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यावर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी incometaxhyderabad.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. त्यासाठी प्रथम अधिसूचना डाउनलोड करून पात्रता तपासावी. त्यानंतर, अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी. अर्ज शुल्क नाही, त्यामुळे कोणतेही आर्थिक बंधन न ठेवता उमेदवार सहज अर्ज करू शकतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. इन्कम टॅक्स विभागात स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी संधीचे सोने करावे आणि अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. ही सुवर्णसंधी गमावू नका!