किसान सभेच्या शेतकरी, शेतमजूर व आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतले असून मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय झाल्याने सुरगाणा, कळवण, पेठ, चांदवड तालुक्यातील हजारो आंदोलनकर्ते दिंडोरीत जमा होत आहेत. त्यामुळे दिंडोरी तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.हातात लाल झेंडे घेतलेले अबालवृद्ध, महिला, युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले असून ‘लाल झेंडा’, ‘लाल सलाम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. या घोषणांमुळे दिंडोरी परिसर अक्षरशः लाल वादळात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.नाशिक जिल्हा किसान सभा,M माकप, डीवायएफएस व जनवादी महिला संघटनांच्या वतीने शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. कडाक्याची थंडी, अंधारी रात्र आणि दिवसाचे तळपते ऊन अंगावर घेत आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे. रस्त्यावरच तीन विटांची चूल पेटवून खिचडी शिजवली जात असून, घरदार मागे टाकून हक्कासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.दरम्यान, सुरगाणा तालुका किसान सभेचे लाल वादळ कॉ. जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथून पायी नाशिकच्या दिशेने रवाना झाले होते. पांडाणे येथे मुक्कामानंतर सुमारे सहा ते सात हजार आंदोलक पुन्हा नाशिककडे कूच करत आहेत.