अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयातील गोदामातून ड्रग्ज काढून त्याची परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संशयित पोलीस कर्मचाऱ्याची स्थानिक गुन्हे शाखेत झालेली नियुक्ती आणि त्याचे पारनेर कनेक्शन यावरून त्यांनी संशय व्यक्त केला आहे. विखे पाटील यांनी मागणी केली की संबंधित कर्मचारी गुजर याला एलसीबीमध्ये कोणाच्या शिफारशीने बदली झाली आणि गायब केलेले ड्रग्ज पारनेरमध्ये कोणाच्या घरी ठेवले होते याची नावे पोलिसांनी जाहीर करावीत. या प्रकरणात अनेक राजकीय धागेदोरे असल्याचा दावा करत त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. मुदतीत आरोपींच्या लिंक्स समोर न आणल्यास नावासहित सर्व माहिती पत्रकार परिषदेत उघड करू असा इशारा विखेंनी दिला आहे. यावेळी विखे यांनी बदलापूर घटनेवरून राज्याच्या शिक्षण विभागवरही ताशेरे ओढले आहेत तर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर पदाबाबतही विखेंनी मोठे वक्तव्य केले आहे.