Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियमावली आणणार; मंत्री जयकुमार गोरे

सध्या संबंधित जिल्हा परिषदांमध्ये प्रथम मुख्याध्यापक पदासाठी शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतर अतिरिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2026 | 02:35 AM
शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  नियमावली आणणार; मंत्री जयकुमार गोरे
Follow Us
Follow Us:

बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन नियमावली तयार
विधानसभा सदस्य श्रीजया चव्हाण यांनी उपस्थित केला प्रश्न
मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले उत्तर

मुंबई: शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांची पदोन्नती, समायोजन आणि बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन नियमावली तयार करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य श्रीजया चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री गोरे म्हणाले की, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षक पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. टीईटी संदर्भातील अनेक प्रकरणे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने पदोन्नती आणि त्यानंतरची समायोजन प्रक्रिया विलंबाने होत आहे. यावर्षी संच मान्यता नेहमीप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत न होता फेब्रुवारीमध्ये मिळाल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन वेळेत होऊ शकले नाही.

NEET Pre Ayurveda 2026: संस्कृतच्या विद्यार्थ्यांना १० वी नंतर थेट आयुर्वेद डॉक्टर बनता येणार; जाणून घ्या सविस्तर

सध्या संबंधित जिल्हा परिषदांमध्ये प्रथम मुख्याध्यापक पदासाठी शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतर अतिरिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अतिरिक्त शिक्षक समायोजनाचे अधिकार १८ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) आहेत. त्यामुळे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षक बदलीची विद्यमान प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट झाली आहे. या संदर्भातील शेकडो शासन निर्णयांमुळे प्रक्रिया अनेक टप्प्यांत ऑक्टोबरपर्यंत सुरू राहते. या प्रक्रियेत सुधारणा करण्याची आवश्यकता असून, शासन यासाठी सर्वसमावेशक नियमावली तयार करणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांची पदोन्नती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि बदली प्रक्रिया पूर्ण होईल, यासाठी शासन आवश्यक कार्यवाही करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.

Indian Army Medical Officer Jobs: भारतीय सैन्यात डॉक्टर व्हायचयं! मग ‘हे’ पात्रता निकष लगेच जाणून घ्या

विद्यार्थ्यांना १० वी नंतर थेट आयुर्वेद डॉक्टर बनता येणार

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि अनोखी बातमी समोर आली आहे. सामान्यतः डॉक्टर बनण्यासाठी १२ वी  उत्तीर्ण होऊन ‘NEET’ सारखी कठीण परीक्षा क्रैक करावी लागते. परंतु, आता या पारंपरिक मार्गापेक्षा एक वेगळा आणि रंजक पर्याय उपलब्ध झाला आहे. विद्यार्थ्यांना १० वी पास झाल्यानंतरच आयुर्वेद डॉक्टर बनण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Guidelines will introduced to complete teacher transfer process before the start of academic year said by jaykumar gore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Career News
  • Jaykumar Gore
  • Schools

संबंधित बातम्या

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती; ‘पवित्र’ पोर्टलवरून थेट…
1

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती; ‘पवित्र’ पोर्टलवरून थेट…

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले
2

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
3

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत
4

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.