फोटो सौजन्य - Social Media
IDBI बँकेने 2025-26 या वर्षासाठी ‘ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM), ग्रेड O’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जाहिरात क्रमांक 3/2025-26 अंतर्गत एकूण 676 पदांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट करिअर संधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 8 मे 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 मे 2025 आहे. उमेदवारांनी www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. ही भरती जलद पदोन्नतीच्या संधीसह सुरू होत असून वार्षिक सीटीसी ₹6.50 लाखांपर्यंत असू शकतो. निवड प्रक्रिया ऑनलाईन टेस्ट, वैयक्तिक मुलाखत व पूर्व-नियुक्ती वैद्यकीय चाचणी यावर आधारित असेल.
उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक असून अनारक्षित वर्गासाठी किमान 60% गुण (SC/ST/PwBD साठी 55%) आवश्यक आहेत. तसेच संगणक साक्षरता अनिवार्य आहे. उमेदवाराचे वय 1 मे 2025 रोजी 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 मे 2000 ते 1 मे 2005 दरम्यान झाला असावा. शासन नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल — SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, PwBD साठी 10 ते 15 वर्षे आणि माजी सैनिकांसाठी नियमानुसार सूट आहे.
उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट (बहुपर्यायी स्वरूपातील), कागदपत्र पडताळणी, वैयक्तिक मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी यावर आधारित असेल. ऑनलाईन टेस्टमध्ये इंग्रजी वगळता इतर प्रश्न इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा करण्यात येतील. सर्व विभागांत आणि एकूण गुणांमध्ये पात्रता मिळवणं आवश्यक आहे.
अर्ज कसा कराल:
IDBI च्या www.idbibank.in या वेबसाइटला भेट द्या, “Careers > Current Openings” विभागात “Junior Assistant Manager (JAM) Grade O – 2025-26” या लिंकवर क्लिक करा. वैध ईमेल व मोबाइल क्रमांकासह नोंदणी करा, अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि ऑनलाईन फी भरून अर्ज सादर करा. नंतर अर्जाची प्रिंट व फीची पावती सुरक्षित ठेवा.