आता दारू पिण्यासाठीही मिळणार पैसे (फोटो सौजन्य - iStock)
जर तुम्हाला दारू पिण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे असं समजा. तुम्हाला ४ वर्षे वाइन पिण्याची संधी चालून आली आहे. स्पेनमधील एका विद्यापीठाला संशोधनासाठी दहा हजार स्वयंसेवकांची आवश्यकता आहे आणि यावर आता अभ्यास करण्यात येत आहे.
खरं तर, जगभरात दारूबाबत हा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो – कमी प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी चांगले आहे की त्यामुळे आजारांचा धोका वाढतो? आता या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी स्पेनमधील नवारा विद्यापीठाने एक अतिशय अनोखे आणि मोठे संशोधन सुरू केले आहे. यासाठी, संशोधक १०,००० स्वयंसेवकांच्या शोधात आहेत जे पुढील चार वर्षे नियमितपणे वाइन पितील.
UPSC चे पूर्वपरीक्षा वेळापत्रक जाहीर, दोन सत्रात होणार आयोजन; जाणून घ्या एका क्लिकवर
काय आहे नाव?
या संशोधनाचे नाव “University of Navarra Alumni Trialist Initiative (UNATI)” आहे आणि त्याला युरोपियन रिसर्च कौन्सिलकडून निधी दिला जात आहे. हा अभ्यास विद्यापीठाच्या प्रतिबंधात्मक औषध विभागाकडून केला जात आहे, ज्यामध्ये नर्सिंग कॉलेज आणि अनेक आरोग्य तज्ज्ञांचाही समावेश आहे. त्यामुळे ही नोकरी संपूर्णतः अभ्यास करण्यासाठी असणार आहे आणि तुम्हालाही नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. तुम्हाला जर दारू पिण्यात खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता.
कोण सहभागी होऊ शकते?
या अभ्यासासाठी, ५० ते ७० वर्षे वयोगटातील पुरुष आणि ५५ ते ७५ वर्षे वयोगटातील महिलांचा समावेश केला जाईल, जे आधीच आठवड्यातून किमान तीन वेळा मद्यपान करतात. आतापर्यंत सुमारे ४,००० लोकांनी नोंदणी केली आहे, परंतु संशोधक जून २०२५ पर्यंत १०,००० सहभागींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. इच्छुक लोक प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाइटला http://inscripcion.proyectounati.com/ भेट देऊ शकतात आणि आरोग्य आणि लाइफस्टाइल फॉर्म भरू शकतात.
IPS Success Story: डान्समध्ये हुशार, ऍक्टिंगमध्ये अव्वल! मग कशी बनली ‘Lady Singham’? नक्की वाचा
स्वयंसेवकांना काय करावे लागेल?
मेडिटेरेनियन डाएटपासून प्रेरणा
या संशोधनाची प्रेरणा प्राध्यापक मार्टिनेझ-गोंझालेझ यांच्या मागील अभ्यासातून मिळाली, PREDIMED, ज्यामध्ये भूमध्यसागरीय आहाराचे फायदे दिसून आले. ते म्हणाले की आहार किंवा जीवनशैलीशी संबंधित अभ्यासासाठी वेळ आणि मोठ्या संख्येने लोकांची आवश्यकता असते.
वाइन खरोखरच आरोग्यासाठी चांगले आहे का? असा प्रश्न ज्यांना आहे त्यांच्यासाठी उत्तर म्हणजे या प्रयोगाचा उद्देश मर्यादित प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी खरोखर फायदेशीर आहे का की ती समाजात फक्त एक स्वीकारलेली सवय आहे हे समजून घेणे आहे. त्याचा परिणाम विशेषतः कर्करोग, हृदयरोग आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या गंभीर आजारांवर दिसून येईल.