Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Kanpur Hires Nisarga Adhikary: केवळ एका ब्लॉगमुळे १९ वर्षीय तरुणाला IIT कानपूरमध्ये थेट नोकरी! रिझ्युमे न देताच झाली निवड

Nisarga Adhikary IIT Kanpur: १९ वर्षांच्या निसर्ग अधिकारीने सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग पोर्टल मधील त्रुटी उघड केल्या. त्याचा ब्लॉग वाचून आयआयटी कानपूरने त्याला थेट नोकरी दिली.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 11, 2026 | 11:37 AM
NISARG

NISARG

Follow Us
Follow Us:

Nisarga Adhikary IIT Kanpur: सध्या कोणतीही नोकरी मिळवण्यासाठी आधी रिझयुमे पाठवावा लागतो आणि त्यानंतर मुलाखत होऊन निवड केली जाते. परंतु, १९ वर्षांच्या निसर्ग अधिकारी या तरुणाला केवळ एका ब्लॉकमुळे आयआयटी (IIT) कानपुरच्या ‘टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब’ (C3iHub) मध्ये ‘ओपन-सोर्स इंटेलिजन्स’ (OSINT) आणि ‘थ्रेट इंटेलिजन्स इंजिनिअर’ (Threat Intelligence Engineer) म्हणून थेट नियुक्ती देण्यात आली आहे.

निसर्गने एक ब्लॉग पोस्ट लिहीली होती, ज्यामध्ये त्याने सीबीएसईच्या ‘ऑन स्क्रिन मार्किंग’ पोर्टलमधील सुरक्षेशी संबंधित काही गंभीर त्रुटी समोर आणल्या होत्या. हा ब्लॉग आयआयटी कानपूरचे संचालक प्रा. मनिंद्र अग्रवाल यांच्या वाचनात आला आणि त्यांनी थेट निसर्गशी संपर्क साधला. संचालकांनी सांगितले की, निसर्गला सायबर सुरक्षा टीममध्ये इंजिनिअर म्हणून सामावून घेण्यात आले आहे. आयआयटी कानपूरमध्ये ही भरतीची पहिली वेळ नसून यापूर्वीही काही तरुण अभियंत्यांची अशाच पद्धतीने नियुक्ती केली आहे.

सीबीएसईच्या ‘OSM’ मधील सुरक्षा त्रुटी केल्या उघड

निसर्गने सीबीएसईच्या ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (OSM) प्रणालीच्या सुरक्षेच्या त्रुटी उघड केल्या आहेत. ज्यानंतर डिजिटल मूल्यांकन प्रणालीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. अहवालानुसार, ही प्रक्रिया अत्यंत घाईघाईने लागू करण्यात आली होती. पहिलया टेंडरमध्ये एकही कंपनी पात्र ठरली नसून नंतर हे काम ‘Coempt Edu Teck’ या कंपनीला मिळाले. तपासणीत असेही आढळून आले की, या कंपनीचे सायबर सुरक्षा प्रमाणपत्र दुसऱ्या एका क्लायंटच्या जुन्या आणि टेस्टिंग सिस्टिमशी संबंधित होते.

Study Abroad: परदेशात उच्च शिक्षणाचं स्वप्न आहे? अमेरिका-ब्रिटन विसरा; ‘या’ ३ देशांत मिळेल सर्वात स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण!

इयत्ता सहावीपासून सायबर सुरक्षेची आवड

आयआयटी कानपूरमध्ये आता निसर्ग इंटरनेटवर उपलब्ध माहितीचे(OSINT) विश्लेषण करेल आणि वेगवेगळ्या वेबसाईट्स व ॲप्समधील सुरक्षा त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्यास मदत करेल. त्याला कंत्राटी तत्वावर (Contract Basis) सायबर सुरक्षा टीममध्ये घेण्यात आले आहे. निसर्गने सांगितले की, शैक्षणिक संस्थेत काम करण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव असेल. यापूर्वी त्याने काही स्टार्टअप्ससोबत काम केले आहे. तसेच लहानपणापासूनच कोडिंगची आवड असणारा निसर्ग इयत्ता सहावीपासूनच सायबर सुरक्षा सीटीएफ (CTF) स्पर्धामध्ये भाग घेत असे.

UPSC Preparation: विकास दिव्यकीर्ती सरांच्या मते IAS होण्यासाठी ‘या’ ३ सवयी आहेत सर्वात महत्त्वाच्या; तुम्ही त्या फॉलो करता का?

Web Title: Iit kanpur hires nisarga adhikary cyber security engineer cbse osm marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • cyber
  • cyber scam
  • cyber security experts
  • education
  • IIT Kanpur

संबंधित बातम्या

BRICS Education: भविष्यातील रोजगाराचे गणित कसे बदलणार? जाणून घ्या ब्रिक्सचा नवा एजेंडा!
1

BRICS Education: भविष्यातील रोजगाराचे गणित कसे बदलणार? जाणून घ्या ब्रिक्सचा नवा एजेंडा!

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….
2

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!
3

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?
4

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.