Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

INSPIRE Scholarship: १२ वी नंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी कशी मिळणार ८०,००० रुपयांची स्कॉलरशिप? जाणून घ्या पात्रता निकष!

INSPIRE Scholarship for Students: केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे (DST) दिली जाणारी 'इन्स्पायर स्कॉलरशिप' २०२६ ची संपूर्ण माहिती. १२ वी नंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांना मिळणारी ८०,००० रुपयांची मदत आणि अर्ज प्रक्रिया वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 27, 2026 | 12:48 PM
Scholarship

Scholarship

Follow Us
Follow Us:

INSPIRE Scholarship for Science Students: देशातील लाखो विद्यार्थी १२ वी नंतर पुढील उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहतात. परंतु, अनेकदा अर्थिक अडचण त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. विशेषत: सायन्स स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा खर्च उचलणे सोपे नसते. अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून ही स्कॉलरशिप दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया या स्कॉलरशिपबद्दल सविस्तर…

विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे (DST) ‘इन्स्पायर स्कॉलरशिप’ (INSPIRE Scholarship for Higher Education) दिली जाते. भविष्यात शास्त्रज्ञ बनून देशाच्या विकासात योगदान देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे, हा यामागचा हेतू आहे.

किती मिळते स्कॉलरशिप?

केंद्र सरकारच्या या शिष्यवृत्तीअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी ८०,००० रुपये रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. ही मदत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना मिळते. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही पात्रता परीक्षा नाही.

School Dropout: युनिसेफच्या (UNICEF) सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव! ‘या’ कारणास्तव ६ वी ते ८ वी दरम्यान मुली शाळा सोडतायत

कोण करू शकतो अर्ज? (पात्रता निकष)

  • या स्कॉलरशिपला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय १७ ते २२ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • विद्यार्थी विज्ञानाशी संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थ्याचे १२ वीच्या बोर्ड परीक्षेत मिळालेले गुण हे केंद्रीय किंवा राज्य बोर्डाच्या टॉप-१% (Top 1%) विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे.
  • याशिवाय JEE Main, JEE Advanced किंवा NEET परीक्षेत टॉप १०,००० रँक मिळवणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतात.
  • IISER, NISER, DAE-CBS सारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
  • KVPY, NTSE, JBNSTS किंवा सायन्स ऑलिम्पियाडमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.
या स्कॉलरशिपचा विज्ञान शाखेतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमेटिक्स, बायोलॉजी, स्टॅटिस्टिक्स, जिओलॉजी. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि अ‍ॅस्ट्रोनॉमी विषयांच्या विद्यार्थ्यांना फायदा मिळू शकतो.

अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ‘इन्स्पायर’च्या (INSPIRE) अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वत:चे प्रोफाईल तयार करावे लागेल. त्यानंतर १२ वीची मार्कशीट, रँक प्रमाणपत्र किंवा प्रवेश परीक्षेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याच्या स्वत:च्या नावावर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बचत खाते (Savings Account) असणे आवश्यक आहे, कारण या स्कॉलरशिपची रक्कम थेट याच खात्यात जमा होते

Padma Shri Awards: देशातील सर्वोच्च सन्मान ‘पद्मश्री’ पुरस्काराची निवड कशी होते? सर्वसामान्य नागरिकही करू शकतात का शिफारस?

Web Title: Inspire scholarship for higher education dst 80000 science students apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • 12th
  • Scholarship Exam
  • science news
  • Student

संबंधित बातम्या

CBSE Class 12 Assessment: CBSE १२ वीचा असेसमेंट फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात; परदेशी विद्यार्थ्यांची धाव, काय आहेत मागण्या?
1

CBSE Class 12 Assessment: CBSE १२ वीचा असेसमेंट फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात; परदेशी विद्यार्थ्यांची धाव, काय आहेत मागण्या?

राज्यातील अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू- शिक्षण संचालकांचे सर्व शाळांना निर्देश
2

राज्यातील अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू- शिक्षण संचालकांचे सर्व शाळांना निर्देश

Career Options After 12th: मल्टीनेशनल कंपनीत काम करायचयं! मग १२ वी नंतर ‘हे’ कोर्सेस ठरू शकतात करिअरसाठी गेमचेंजर
3

Career Options After 12th: मल्टीनेशनल कंपनीत काम करायचयं! मग १२ वी नंतर ‘हे’ कोर्सेस ठरू शकतात करिअरसाठी गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.