Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय वायू दलात नोकरीची संधी! IAF कडून जाहीर करण्यात आली अधिसूचना; अग्निवीर भरती

भारतीय हवाई दलाने अग्निवीरवायु 2027 भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांना https://iafrecruitment.edcil.co.in या संकेतस्थळावर 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करता येणार.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 16, 2026 | 02:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force – IAF) अग्निवीरवायु 2027 भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या पात्र उमेदवारांना ही एक मोठी संधी मानली जात आहे.

शाळांसाठी ‘डिसिप्लिन फॉर्म्युला’! ‘गप्पा विथ सीईओ’; शिक्षकांची अनुपस्थिती

भारतीय हवाई दलाने ही अधिसूचना 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://iafrecruitment.edcil.co.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी 2026 असून, उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अग्निवीरवायु 2027 भरतीसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता तसेच वैद्यकीय व शारीरिक निकष ठरवण्यात आले आहेत.

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवारांचे कमाल वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2009 या कालावधीत झालेला असावा. ही वयोमर्यादा पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी समान आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच,

  • विषय : गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी
  • एकूण किमान 50 टक्के गुण
  • इंग्रजी विषयात स्वतंत्रपणे किमान 50 टक्के गुण अनिवार्य
अटी पूर्ण करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेस पात्र ठरणार आहेत.

वैद्यकीय व शारीरिक निकष

भरती प्रक्रियेत वैद्यकीय आणि शारीरिक निकषांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

  • किमान उंची : 152 सेमी
  • पर्वतीय व ईशान्य भारतातील महिला उमेदवारांना 5 सेमी उंचीची सवलत
  • दृष्टी, ऐकण्याची क्षमता, दात याबाबत ठरावीक वैद्यकीय निकष लागू
  • पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वैद्यकीय निकष वेगवेगळे आहेत
फक्त अविवाहित उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. तसेच, महिला उमेदवार भरती प्रक्रियेदरम्यान गर्भवती आढळल्यास त्यांना अपात्र ठरवले जाईल, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

अग्निवीरवायु 2027 भरतीसाठी निवड प्रक्रिया विविध टप्प्यांत पार पडणार आहे.

  1. ऑनलाईन लेखी परीक्षा
  2. कागदपत्र पडताळणी
  3. शारीरिक चाचणी

LLB की BA Law? १२वी नंतर लॉ क्षेत्रात करिअरसाठी कोणता कोर्स योग्य?

शारीरिक चाचणीमध्ये:
  • पुरुष उमेदवारांसाठी : 1.6 किमी धावणे – 7 मिनिटांत
  • महिला उमेदवारांसाठी : 1.6 किमी धावणे – 8 मिनिटांत
भारतीय हवाई दलात सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही भरती एक मोठी संधी असून, पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Job opportunity in the indian air force notification issued by the iaf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Career
  • iaf jet
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन
1

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन

शालांत परीक्षांचे ८,५०० केंद्र सज्ज! परीक्षक, साहित्य व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ
2

शालांत परीक्षांचे ८,५०० केंद्र सज्ज! परीक्षक, साहित्य व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज
3

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज

Rafale Deal: आकाशातील अजेय गरुड ‘राफेल’ पुन्हा घिरट्या घालण्यास सज्ज; India-France मेगा डीलने दिपले सर्वांचेच डोळे
4

Rafale Deal: आकाशातील अजेय गरुड ‘राफेल’ पुन्हा घिरट्या घालण्यास सज्ज; India-France मेगा डीलने दिपले सर्वांचेच डोळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.