Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI University in India: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; देशातील पहिली सरकारी ‘एआय युनिव्हर्सिटी’ ‘या’ राज्यात उभारणार!

First AI University India: कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी देशातील पहिल्या सरकारी एआय विद्यापीठाची घोषणा केली आहे. बंगळुरू येथील १०० एकरांचा मुख्य परिसर आणि इतर प्रादेशिक कॅम्पसची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 15, 2026 | 05:23 PM
ai university

ai university

Follow Us
Follow Us:

First AI University India: आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (AI) वाढते महत्त्व लक्षात घेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी काल म्हणजेच 14 जुलै रोजी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, कर्नाटक राज्यात देशातील पहिले सरकारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. यासोबतच एक ‘एआय हब’ देखील तयार केले जाईल, जिथे स्टार्टअप्स, संशोधक आणि कंपन्या एकत्र येऊन नवीन तंत्रज्ञानावर काम करू शकतील.

AI शिक्षण आणि संशोधनाला मिळणार चालना

बंगळुरू येथे आयोजित ‘गुगल आय/ओ कनेक्ट इंडिया २०२६’ (Google I/O Connect India 2026) या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी एआय युनिव्हर्सिटी आणि हब संदर्भातील ही घोषणा केली. ते म्हणाले की, “प्रस्तावित एआय युनिव्हर्सिटीचे उद्दिष्ट जागतिक दर्जाचे एआय एक्सपर्ट्स (तज्ज्ञ) तयार करणे हे आहे. येथे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणासोबतच संशोधन आणि उद्योगांशी जोडण्याची संधी मिळेल. यामुळे विद्यापीठ, इंडस्ट्री आणि सरकार यांच्यात अधिक चांगला ताळमेळ विकसित होईल.”

बंगळुरूमध्ये सुमारे १०० एकरांवर उभारणार मुख्य कॅम्पस

शिक्षणात सुधारणा करण्यासोबतच आरोग्य सेवा अधिक चांगल्या करणे, शेतकऱ्यांना अचूक सल्ला देणे आणि सरकारी सेवा अधिक वेगवान व पारदर्शक बनवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.

प्रस्तावित एआय युनिव्हर्सिटीचा मुख्य परिसर बंगळुरूमध्ये सुमारे १०० एकर जागेवर विकसित केला जाईल. तसेच याचे प्रादेशिक कॅम्पस  कलबुर्गी, बेळगावी, हुबळी-धारवाड, मंगळुरू आणि मैसूरू येथे स्थापन करण्याची योजना आहे.

एआय ही सध्याच्या पिढीतील सर्वात मोठी तांत्रिक क्रांती

तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे नेते, उद्योजक, डेव्हलपर्स, संशोधक आणि धोरणकर्त्यांना संबोधित करताना शिवकुमार म्हणाले की, “एआय ही सध्याच्या पिढीतील सर्वात महत्त्वाची तांत्रिक क्रांती आहे.” त्यांनी याची तुलना स्टीम इंजिन, वीज, इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानाच्या आगमनाशी केली.

कर्नाटकला ‘AI-Native’ राज्य बनवण्याचा सरकारचा मानस

शिवकुमार यांनी माहिती दिली की, भारताच्या एकूण सॉफ्टवेअर निर्यातीत एकट्या कर्नाटकचा वाटा ४०% आहे. तर बंगळुरूमध्ये १७,००० हून अधिक स्टार्टअप्स आणि हजारो ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स कार्यरत आहेत, जे जागतिक बाजारपेठेसाठी उत्पादने डिझाईन करतात.

कर्नाटकला एक ‘एआय-नेटिव्ह’ बनवणे हे सरकारचे ध्येय असून, याद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने प्रशासन आणि सार्वजनिक सेवांचे वितरण अधिक कार्यक्षम केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

US Army Recruitment: भारतीयांना अमेरिकन स्पेशल फोर्समध्ये नोकरी मिळू शकते का? जाणून घ्या लष्कराचे काय आहेत कडक नियम…

गुगलसोबतच्या भागीदारीचे कौतुक

मुख्यमंत्री शिवकुमार यांच्या मते, एआयच्या मदतीने शिक्षक अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकतील, डॉक्टर आजारांचे वेगाने निदान करू शकतील, शेतकऱ्यांना उत्तम कृषी सल्ला मिळेल, नागरिकांना सरकारी सेवांचा थेट लाभ घेता येईल आणि लहान उद्योग आत्मविश्वासाने बाजारात स्पर्धा करू शकतील.

मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकसोबतच्या गुगलच्या दोन दशकांहून अधिक जुन्या भागीदारीचे कौतुक केले. बंगळुरू हे या कंपनीचे प्रमुख ग्लोबल इंजिनिअरिंग, रिसर्च आणि इनोव्हेशन सेंटर बनले आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच सर्च, अँड्रॉईड, युट्यूब, मॅप्स, क्रोम, जीमेल आणि गुगल पे यांसारख्या प्रॉडक्ट्सनी भारतीयांची माहिती मिळवण्याची, व्यवसाय करण्याची आणि सरकारी सेवा वापरण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे, असेही ते म्हणाले.

Medical Admission Update: डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! देशात MBBS प्रवेशासाठी नवीन जागा वाढल्या

विद्यार्थ्यांसाठी खुली होणार नवीन क्षितिजे

एआय युनिव्हर्सिटी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अति-आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांना संशोधन, स्टार्टअप्स आणि मोठ्या टेक कंपन्यांसोबत काम करण्याच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध होतील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

Web Title: Karnataka first government ai university bengaluru dk shivakumar google

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • ai
  • Bengaluru
  • dk shivkumar
  • goverment news
  • Student

संबंधित बातम्या

Japanese Study Trick: परीक्षा क्रॅक करण्यासाठी जपानचे विद्यार्थी नेमकी कोणती ट्रिक वापरतात ? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Japanese Study Trick: परीक्षा क्रॅक करण्यासाठी जपानचे विद्यार्थी नेमकी कोणती ट्रिक वापरतात ? जाणून घ्या एका क्लिकवर..

AI Career Coach: करिअर निवडीबाबत प्रश्न पडलायं? मग AI ला विचारा ‘हे’ ५ महत्त्वाचे प्रश्न..
2

AI Career Coach: करिअर निवडीबाबत प्रश्न पडलायं? मग AI ला विचारा ‘हे’ ५ महत्त्वाचे प्रश्न..

AI Impact in China: चीनमध्ये रोबो आणि एआयचा धुमाकूळ! ‘या’ क्षेत्रातील कामांवर मिळवला ताबा; कामगारांचे काय होणार?
3

AI Impact in China: चीनमध्ये रोबो आणि एआयचा धुमाकूळ! ‘या’ क्षेत्रातील कामांवर मिळवला ताबा; कामगारांचे काय होणार?

Mira Bhayandar News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप; मनसे विद्यार्थी सेनेचे अर्धनग्न आंदोलन, प्रशासनाला अल्टिमेटम
4

Mira Bhayandar News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप; मनसे विद्यार्थी सेनेचे अर्धनग्न आंदोलन, प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.