फोटो सौजन्य - Social Media
भारतीय पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड ने ग्रामीण डाक सेवकांसाठी एक सुवर्णसंधी आणली होती. या भरतीच्या अंतर्गत एकूण 348 पदे भरण्यात येणार होते. या भरती संदर्भात सगळ्यात चांगली बाब म्हणजे ही भरती संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली होती. देशभरातील 348 गरजू उमेदवारांना या नोकरीचा लाभ घेता येणार होता. मुळात, त्या भरतीला सुरुवात नऊ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. मोठ्या संख्येने उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते. जर तुम्ही अद्याप अर्ज केले नाही तर टेन्शन घेऊ नका! कारण वेळ अजून संपली नाही, पण लवकरच संपणार आहे आणि आजच संपेल. 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
अर्ज ऑनलाईन स्वरूपात करण्याचे निश्चित करण्यात आले असून अर्ज करण्यासाठी ipPB च्या www.ippbonline.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी एकदा सगळे अटी शर्ती तपासून घेण्यात यावे.
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये निश्चित करण्यात आले आहे. अर्ज करताना उमेदवारांना या अर्ज शुल्काची भरपाई करणे आवश्यक आहे त्याशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाही. मुळात, ही भरती एक्झिक्युटिव्ह पदासाठी असल्यामुळे अर्ज करता उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी किमान 20 वर्षे आयु निश्चित करण्यात आली असून जास्तीत जास्त 35 वर्षे आईव असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
जाहीर करण्यात आलेला आदेश सूचनेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30000 इतका एकत्रित वेतन मिळेल. प्रमोशन उमेदवाराच्या कामगिरीवर आधारित असेल तर पगाराव्यतिरिक्त कोणताही भत्ता त्याला मिळणार नाही.
निवड प्रक्रियेत चार टप्प्यांचा समावेश आहे: शॉर्टलिस्टिंग, लेखी परीक्षा गरज असल्यास, कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी. या सर्व टप्प्यांना पात्र करत उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे करता येईल अर्ज
ही भरती ग्रामीण डाक सेवकांसाठी बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी आहे.






