(फोटो सौजन्य: X)
गलती से भारी मिस्टेक हो गया! लग्नाच्या एंट्रीत वधू-वरानेच लावली आग, नक्की काय घडलं? पहा Viral Video
काय घडलं व्हिडिओत?
सध्या सोशल मिडियावर एक भावनिक आणि तितकाच संतापजनक असा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो एका डिलिव्हरी बाॅयच्या संबंधित आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘डिलिव्हरी बाॅयना लिफ्ट वापरण्यापासून रोखणे म्हणजे अस्पृश्यतेचेच एक नवीन रूप आहे’. व्हिडिओमध्ये आपल्याला एक माणूस बिल्डिंगच्या पायऱ्यांवरुन भलेमोठे ओझे वाहून नेताना दिसून येईल. ते सामान इतके मोठे होते की, घराच्या दारातूनही त्याला आत नेणे कठीण जात होते. एखाद्याचा त्रास कमी करण्याऐवजी जेव्हा आपण त्याचा त्रास अधिक वाढवण्यावर भर देतो तेव्हा इतकेच स्पष्ट होते की, माणूसकी कुठेतरी हरपली आहे.
Blocking delivery staff from using lifts is just untouchability in a new form. pic.twitter.com/EWrOFtNnSG — Vineeth K (@DealsDhamaka) January 31, 2026
अजब छंद! महिलेकडे 54 हॉन्टेड डॉल्स; खोडकर बाहुल्यांमुळे नाताळात घरात घडतात रहस्यमय घटना
दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @DealsDhamaka नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण त्यांना ब्लॉक का करायचे? आणि मग असं असेल तस डिलिव्हरी बॉयने ते लॉबीमध्येच सोडून द्यायला हवे… हा तर छळ आहे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सोसायटी समितीच्या सदस्यांमध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. हल्ली हे लोक कोणत्या प्रकारचे नियम बनवत आहेत? किमान त्यांना सर्व्हिस लिफ्ट वापरण्याची परवानगी तरी द्यायला हवी. काही अडचण असेल, तर त्यावर उपाय शोधा!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो व्हिडिओ पाहताना खूप दुःख होतं. फक्त आपलं काम करण्यासाठी कोणालाही अशा प्रकारे त्रास सहन करावा लागू नये. सहानुभूती खूप महत्त्वाची असते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






