फोटो सौजन्य - Social Media
कमिंस इंडिया लिमिटेडने ‘रिडिफाइन २०२४’ या बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेचा शुभारंभ केला आहे, ज्यामध्ये १८ प्रमुख बी-स्कूल्सचा समावेश आहे. यावर्षी स्पर्धेची थीम ‘हाऊ डिजिटल सोल्यूशन्स एनेबल सस्टेनेबिलिटी इन ट्रॅडिशनल बिझनेसेस’ अशी आहे, जिचा उद्देश डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पारंपारिक व्यावसायिक मॉडेल्समध्ये सस्टेनेबिलिटी वाढवणे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना धोरणात्मक विचार, सस्टेनेबिलिटी, आणि व्यावसायिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमध्ये कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
हे देखील वाचा : एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ सुपरवाईजर पदासाठी भरतीला सुरुवात; मुलाखतीच्या आधारे होणार निवड
कमिंस इंडियाच्या मानव संसाधन प्रमुख अनुपमा कौल यांनी यावेळी सांगितले की, “कमिंस इंडियामध्ये आम्ही भावी प्रमुखांना विकसित होत असलेल्या व्यवसाय लँडस्केपमधून नेव्हिगेट करण्यास आणि आकार देण्यास प्रेरित आणि त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत. सुरुवातीपासूनच आमची केस स्टडी स्पर्धा या ध्येयाचा महत्त्वपूर्ण भाग राहिली आहे. सस्टेनेबिलिटी आणि टेक्नोलॉजीच्या वाढता वापर आपल्या जगाला नवीन आकार देत असल्याने, सस्टेनेबल पर्यावरण घडवण्यासाठी टेक्नोलॉजीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. रिडिफाइन २०२४ विद्यार्थ्यांना डिजिटलायझेशन अर्थपूर्ण परिवर्तनाला कशाप्रकारे चालना देऊ शकते हे दाखवण्यासाठी अपवादात्मक प्लॅटफॉर्म देते.”
या स्पर्धेतील अंतिम फेरी १४-१५ नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यात होणार आहे. विजेत्या टीमला रोख पारितोषिक तसेच कमिंस इंडियाच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये सामील होण्याची संधी मिळेल. यात विद्यार्थ्यांना उद्योगातील नेत्यांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळणार आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश पारंपारिक उद्योगांमध्ये डिजिटल इनोव्हेशनच्या मदतीने सस्टेनेबिलिटी कशी आणता येईल, हे शोधणे आहे. कमिंस इंडिया गेल्या काही वर्षांपासून ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करत आहे. २०२३ मध्ये, या स्पर्धेत देशभरातील ३७५२ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.