
admission
तिसऱ्या फेरीअंती ६० हजार ८३९ विद्यार्थ्यांनी बेटरमेंटचा पर्याय( विद्यार्थ्यांचा पहिल्या कॉलेजचा प्रवेश सुरक्षित राहतो ) स्वीकारला होता. त्यांनी चौथ्या फेरीमध्ये सहभाग नोंदवला होता. परंतु या विद्यार्थ्यांचे बेटरमेंट झाले नाही. यामुळे विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत मिळालेले कॉलेजच पुन्हा मिळाले.
यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यात २ लाख ३ हजार २९३ जागा उपलब्ध होत्या त्यापैकी १ लाख ८१ हजार २८३ विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये जागा वाटप केल्या होत्या.
यामध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत जवळजवळ ९३ हजार २३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यामुळे चौथ्या फेरीसाठी ८८ हजार ४८ जागा उपलब्ध असून आणखी २२ हजार दहा जागा रिक्त आहेत या जागा उर्वरित विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील.
आता ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे. त्या विद्यार्थ्यांनी आजपासून सात सप्टेंबर पर्यंत मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक कागदपत्रे सादर करून आणि प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. यानंतर ८ ते १५ सप्टेंबर या कालावधीत संस्थापक फेरीची प्रवेश होणार आहेत.