Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2026 | 12:51 PM
बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Follow Us
Follow Us:

बारामती : भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे पाच वाजता तिचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीने देखील अशाच प्रकारे गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती, या घटनेनंतर ही दुसरी आत्महत्या आहे, त्यामुळे बारामती परिसरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत विद्यार्थिनी बारामतीतील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. मागील काही दिवसांपासून अभ्यास होत नसल्याने तसेच परीक्षेचे टेन्शन येत असल्याचे ती आई-वडिलांना सांगत होती, अशी प्राथमिक माहिती पालकांनी पोलिसांना दिली आहे.

गुरुवारी रात्री ती सुमारे साडेबारा वाजेपर्यंत अभ्यास करीत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येते, असे सांगून ती चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली न आल्याने वडील तिला पाहण्यासाठी वर गेले. त्यावेळी ती टेरेसच्या कड्यावर बसलेली दिसली. वडिलांनी आवाज दिल्यानंतर तिने अचानक खाली उडी मारल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर आई-वडील व शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान काही काळ ती शुद्धीवर होती. मात्र त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने तिचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी कुटुंबीयांनी सध्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध संशय किंवा तक्रार व्यक्त केलेली नाही. मात्र अभ्यास व परीक्षेचा ताण हे प्राथमिक कारण सांगितले जात असले तरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वीही सदर विद्यार्थिनी घरातून निघून गेल्याची नोंद पोलिसांकडे असल्याने त्या प्रकरणातील कागदपत्रे व तपासातील बाबींची पडताळणी केली जात आहेत. घटनास्थळ, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे तसेच डिजिटल माहितीची तपासणी करण्यात येत आहे. पालक, नातेवाईक, मैत्रिणी, सहाध्यायी व शिक्षकांचे जबाबही घेण्यात येत आहेत.

बारामती शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून तिचे नाव, छायाचित्र किंवा ओळख पटेल अशी माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्…

Web Title: An incident of a female student committing suicide has occurred in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • baramati
  • maharashtra
  • Sucide News

संबंधित बातम्या

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?
1

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र खेबुडकर यांची सिंधुदुर्गातून पुण्यात बदली
2

राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र खेबुडकर यांची सिंधुदुर्गातून पुण्यात बदली

Bhandara News: केवायसीने अडविला लाडक्या बहिणींचा हप्ता! जिल्ह्यात २ लाख ९९ हजार लाभार्थी, शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष
3

Bhandara News: केवायसीने अडविला लाडक्या बहिणींचा हप्ता! जिल्ह्यात २ लाख ९९ हजार लाभार्थी, शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष

दहीहंडीतील अश्लील नृत्याला पोलिसांचा ‘ब्रेक’! आक्षेपार्ह कार्यक्रम झाल्यास थेट…; पोलीस आयुक्तांचा इशारा
4

दहीहंडीतील अश्लील नृत्याला पोलिसांचा ‘ब्रेक’! आक्षेपार्ह कार्यक्रम झाल्यास थेट…; पोलीस आयुक्तांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.