Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?

Management Quota Admission 2026-27: कॉलेज प्रवेश प्रक्रियेत मॅनेजमेंट कोट्याच्या जागांबाबत होणारा गैरप्रकार आणि मनमानीला आळा घालण्यासाठी 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून CET Cell ने कडक पावले उचलली आहेत. संस्थास्तरीय म्हणजेच Institutional Quota प्रवेश प्रक्रियेवर थेट देखरेख ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 04, 2026 | 01:11 PM
Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 026-27 पासून Institutional Quota प्रवेशावर CET Cellची थेट नजर.
  •  निवडक खासगी कॉलेजमध्ये सरकारी निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार.
  •  मॅनेजमेंट कोट्यातील गैरप्रकार आणि मनमानीला आळा घालण्याचा प्रयत्न.
 

Management Quota Admission: मोठमोठ्या कोर्सला प्रवेश घेताना सर्वात जास्त गोंधळ होतो. आधी मुलांच्या प्रवेशांच्या याद्या लागतात. मात्र एक जागा ही विशेष कोट्यासाठी ठेवली जाते त्याला आपण म्हणतो मॅनेजमेंट कोटा. या कोट्यामध्ये कॉलेज कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्याना अगदी सहज घेतात. काहीतर विद्यार्थ्यांकडून भरघोस पैसे घेऊन त्या जागा विकतात. त्यामुळे जो विद्यार्थी ती जागा मिळवण्यासाठी खरा प्राप्त असतो तो मात्र मागे राहतो. आता मात्र यावर्षीपासून हा मॅनेजमेंटचा खेळ बंद होणार आहे. सीईटी सेल (CET Cell) म्हणजे ‘राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष’ (State Common Entrance Test Cell) या कक्षाने कडक पावले उचलली आहेत.

2026-27 या वर्षापासून संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेवर म्हणजेच Institutional Quota वर सरकार थेट वॉच ठेवणार. आता कॉलेजमध्ये सरकारी निरीक्षक बसणार CET Cell चे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी याबाबत एक परिपत्रक जाहीर केलं आहे. यानुसार ज्या खासगी कॉलेजमध्ये संस्थास्तरीय प्रवेश होईल तिथे निवडक कॉलेजमध्ये निरीक्षक नेमले जातील. Management Quota Admission 2026-27:

निरीक्षक कोण असणार?

त्या विभागाच्या सरकारी कॉलेजचे प्राचार्य, संचालक किंवा सिनियर प्रोफेसर असतील. हे शिक्षक रोज कॉलेजमध्ये बसून पूर्ण प्रवेश प्रक्रिया बघणार तसेच कागदपत्रं तपासणं, मेरीट लिस्ट बनवणं, फी भरणं आणि जागा वाटप या सर्व गोष्टीवर त्यांची नजर असेल. रोज काम दिवस संपल्यावर त्यांना काय झालं याचा रिपोर्ट वर पाठवावा लागणार आहे.

सगळं रेकॉर्डिंग CCTV मध्ये कैद होणार

आता कॉलेजला मनमानी कारभार करता येणार नाही. ज्या खोलीत कागदपत्र पडताळणी आणि जागा वाटप होईल त्या खोलीत CCTV असणं बंधनकारक असेल. फक्त CCTV नाहीतर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण सुरक्षित ठेवावं लागेल. कोणत्याही विद्यार्थ्यांनी तक्रार केली असता,ते रेकॉर्डिंग CET Cell ला द्यावं लागेल. त्यामुळे मागच्या दाराने ॲडमिशनचा प्रकार बंद होईल.

NEET-UG 2027 CBT Mode : नीट परीक्षा सीबीटी मोडमध्ये घेण्याच्या हालचाली; ‘या’ संस्थांमध्ये शोधले जात आहेत टेस्टिंग सेंटर

नियमावली जाहीर…

  • CAP च्या सगळ्या फेऱ्या पूर्ण झाल्याशिवाय कॉलेजला संस्थास्तरीय प्रवेश सुरूच करता येणार नाही.
  • जागा असतील तर त्या गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावे लागतील
  • कॉलेजला दोन याद्या बघून मेरीट लिस्ट बनवावी लागेल,
  • त्यामधली एक म्हणजे थेट कॉलेजकडे आलेले अर्ज आणि दुसरी म्हणजे CET Cell ने दिलेली लिस्ट असेल.
  • यामधूनच कॅटेगिरीनुसार लिस्ट तयार करावी लागेल.
  • विद्यार्थ्यांनी एजंटपासून सावध राहादरम्यान CET Cell ने विद्यार्थी आणि पालकांना पण इशारा दिला आहे.
CAP ची प्रक्रिया सुरू असतानाच काही एजंट, मध्यस्थ लोक येतात आणि आम्ही जागा मिळवून देतो, पैसे द्या असं सांगतात. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असं सांगण्यात आलं आहे.तुम्हाला काही शंका असेल तर थेट CET Cell ला संपर्क साधा किंवा पुढील दिलेल्या संपर्कावर तक्रार नोंदवू शकता.
  • https://sac.maharashtracet.org/mhcet/submit-ticket या संकेतस्थळावर तक्रार करु शकता
  • cethelpdesk@maharashtracet.org वर मेल करू शकता.
  • 07969134401 आणि 07969134402 या नंबरवर फोन पण करू शकता.
  • राज्यात 36 जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्र
School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम

Web Title: Cet cell to monitor institutional quota admissions in private colleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Admission News
  • career guide
  • Career News
  • College

संबंधित बातम्या

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला
1

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम
2

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई
3

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई

best engineering branch : १२ वी नंतर इंजिनिअरिंगची कोणती शाखा सर्वोत्तम? करिअर निवडताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
4

best engineering branch : १२ वी नंतर इंजिनिअरिंगची कोणती शाखा सर्वोत्तम? करिअर निवडताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.