Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET Exam Cancelled: उद्या होणारी टीईटी परीक्षा खरोखरच रद्द! पेपर फुटल्याच्या वृत्ताने उमेदवारांमध्ये निर्माण झाला संताप

TET Exam Cancelled 2026 Paper Leak : राज्यभरात २८ जून रोजी आयोजित करण्यात आलेली टीईटी (TET) परीक्षा पेपरफुटीच्या आरोपामुळे अचानक रद्द करण्यात आली आहे का? या धक्कादायक बातमीमागील नेमके सत्य काय? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 27, 2026 | 03:18 PM
TET

TET

Follow Us
Follow Us:

Maharashtra TET Exam Cancelled 2026 Paper Leak : राज्यभरात कित्येक विद्यार्थी आणि कार्यरत शिक्षक सध्या टीईटी (TET- Teacher Eligibility Test) परीक्षेच्या तयारीला लागले होते. ही परीक्षा २८ जून २०२६ रोजी महाराष्ट्रातील अनेक परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या शिक्षक पात्रता परीक्षेला उमेदवारांची रेकॉर्डब्रेक नोंदणी झाली होती. परंतु, आता टीईटीचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर येताच शिक्षण विभागाकडून उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या या परीक्षेच्या आधीच ठाणे परिसरात पेपर फुटल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली आहे. काही टोळ्या उमेदवारांकडून पैसे घेऊन टीईटीचा पेपर पुरवत असल्याचा सुगावा पोलिसांना लागताच त्यांनी ही माहिती तात्काळ शिक्षण विभागाला दिली.

पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी

सध्या या पेपर फुटीच्या प्रकरणात समाविष्ट असणाऱ्या संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांच्या ताब्यात असणारे हे लोक नेमके कोण आहेत? त्यांच्याकडे हा गोपनीय पेपर कसा व कोठून आला? यामध्ये कोचिंग संस्थांचा किंवा शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा हात आहे का? या संबंधित सर्व बाजूंचा तपास पोलिस करत आहेत.

NCERT Class 9 Book: ९ वीच्या नव्या पुस्तकातील ‘मनुस्मृती’च्या संदर्भावरून का पेटला नवा वाद? जाणून घ्या एका क्लिकवर..

सध्या या प्रकरणातील आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आली असून पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर या रॅकेटचा मुख्य सुत्रधार समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिक्षण विभागाकडून परीक्षा स्थगितीची अधिकृत घोषणा होणार

गेल्या काही दिवसांपासून टीईटी (TET) परीक्षेसंदर्भात विविध कारणामुळे मोठी चर्चा रंगली होती. अशातच आता पेपर लीक झाल्यामुळे शिक्षण विभागाने ही परीक्षा रद्द करत परीक्षा स्थगितीचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाकडून काही वेळातच या संदर्भातील अधिकृत प्रेस नोट आणि सूचना जारी केली जाणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही शिक्षण मंत्रालयाला दिले आहेत.

World Best School Prize 2026: भारतीय शिक्षणाचा जागतिक पातळीवर डंका! वर्लडच्या टॉप-१० शाळांमध्ये पुण्यातील ‘या’ शाळेचाही समावेश

उद्याच्या परीक्षेसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. मात्र ऐन वेळी मिळालेल्या पेपरफुटीच्या माहितीमुळे परीक्षा स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. राज्यात वारंवार शासकीय आणि पात्रता परीक्षांचे पेपर लीक होणे, ही अत्यंत गंभीर बाब असून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळणाऱ्या दोषींबर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटल्याने तो रद्द झाला असून ही टीईटी राज्यात नकोच असल्याची भूमिका शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मांडली आहे. दैनंदिन अध्यापनाचा व टीईटी परीक्षेचा दुरान्वेही संबंध नसल्याने ही टीईटी परीक्षा रद्द करण्याची भूमिका ते राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे मांडणार आहेत.

आधीच दैनंदिन अध्यापनाबरोबरच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्याने या शैक्षणिक कामांमुळे शिक्षक त्रस्त झाले असून शिक्षकांना कोणी वालीच राहिला नाही नसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात टीईटी तसेच बीएलओच्या कामांबाबत राज्यातील सर्व विधानसभेचे आमदार व विधान परिषद सदस्यांकडे शिक्षक महासंघाच्या माध्यमातून निवेदन देणार असल्याचेही अनिल बोरनारे यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra tet exam cancelled paper leak reality june 28

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Maha TET
  • Paper Leak Case
  • TET Exam

संबंधित बातम्या

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.