Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न! ठाण्यात ‘मराठी शाळा कृती समिती’ची स्थापना

मिरा-भाईंदरमध्ये मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी नागरिकांनी ‘मराठी शाळा कृती समिती’ची स्थापना केली असून शाळांचे पुनरुज्जीवन हा प्रमुख हेतू आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 29, 2025 | 07:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • शहरातील मराठी शाळांचे पुनरुज्जीवन हा यामागील मुख्य हेतू
  • शाळांच्या विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार
  • सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग
मिरा-भाईंदर शहरातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने मराठीप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत ‘मराठी शाळा कृती समिती’ची स्थापना केली आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील अनेक मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पटसंख्या लक्षणीयरीत्या घटल्याने त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही चिंताजनक स्थिती पाहता मराठी एकीकरण समितीच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला आला असून, शहरातील मराठी शाळांचे पुनरुज्जीवन हा यामागील मुख्य हेतू आहे.

Maharashtra : समायोजन प्रक्रियेला स्थगिती द्या! प्रहार संघटनेची शिक्षणमंत्र्याकडे मागणी

मिरा-भाईंदरमध्ये महापालिका, शासनमान्य आणि खासगी अशा मिळून २२ मराठी शाळा आहेत. या शाळांमध्ये आवश्यक सुविधा, अध्यापन साहित्य आणि आधुनिक संसाधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृती समितीने स्वेच्छेने स्वीकारली आहे. या मोहिमेत शहरातील १२ सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवला असून, सर्वांनी मिळून एकत्रितपणे शाळांच्या विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

अलीकडेच झालेल्या समितीच्या पहिल्या परिषदेच्या मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत उपस्थित होत्या. परिषदेत मराठी शाळांचे पुनरुज्जीवन, आधुनिक शिक्षण साधनांची अंमलबजावणी, शिक्षक-पालक-शाळा समन्वय आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविता येतील अशा उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली. मराठी शाळा सक्षम झाल्यास शहरातील मराठी संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन अधिक बळकट होईल, असा विश्वास समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला.

सर्व खासगी आणि डीम्ड विद्यापीठांचे देशव्यापी ऑडिट करण्याचे आदेश! कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह

समितीने मांडलेल्या योजना व्यापक असून त्यात पटसंख्या वाढवण्यासाठी जनजागृती, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण पद्धती, कला-क्रीडा-अतिरिक्त उपक्रमांना प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर आधारित कार्यक्रम, तसेच मराठीसोबत इतर भाषांचे प्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध करून देण्यावरही समिती भर देत आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग मिळत असल्याने मिरा-भाईंदरमधील मराठी शाळा पुन्हा सक्षम, स्पर्धात्मक आणि विद्यार्थी-केंद्रित बनतील, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Marathi school action committee established in mira bhayandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 07:06 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • thane

संबंधित बातम्या

THANE : मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉ. लीना बोरुडे यांचा महिलांना आरोग्य सल्ला
1

THANE : मकर संक्रांतीच्या निमित्ताने डॉ. लीना बोरुडे यांचा महिलांना आरोग्य सल्ला

Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर
2

Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Mira Bhayander : उत्पन्न लाखात मात्र संपत्ती करोडोंची ; पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरलेले माजी नगरसेवक
3

Mira Bhayander : उत्पन्न लाखात मात्र संपत्ती करोडोंची ; पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरलेले माजी नगरसेवक

मुंबईत भरलेत मकरसंक्रांत स्पेशल Exhibition! साड्या, ब्लाऊजचे सुंदर आणि हटके पर्याय उपलब्ध
4

मुंबईत भरलेत मकरसंक्रांत स्पेशल Exhibition! साड्या, ब्लाऊजचे सुंदर आणि हटके पर्याय उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.