Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशिममध्ये बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरमध्ये सामूहिक कॉपी! तब्बल ५८१ विद्यार्थ्यांची एकसारखी उत्तरे

बारावीच्या भौतिकशास्त्र परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार वाशिम जिल्ह्यात उघडकीस आला असून ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरे जुळल्याचे आढळले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2026 | 08:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बारावीच्या भौतिकशास्त्र परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात उघडकीस आला आहे. तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी एकसारखी उत्तरे लिहिल्याचे तपासात समोर आले असून या घटनेमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित परीक्षा केंद्रावरील २६ शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

SSC HSC Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स! कशी करावी तयारी? जाणून घ्या

ही घटना वाशिम जिल्ह्यातील टो-जुमडाफाटा येथील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्र क्रमांक ०९०६ येथे घडली. सोमवारी दुपारी बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर सुरू असताना सुमारे २.३० वाजता भरारी पथकाने अचानक पाहणी केली. तपासणीदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी एकाच पद्धतीने उत्तरे लिहिल्याचे आढळले. उत्तरपत्रिकांची सविस्तर छाननी केल्यानंतर ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरे अक्षरशः जुळत असल्याचे स्पष्ट झाले. वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्येही समान चुका आणि एकसारख्या खूणा आढळल्यामुळे संशय अधिक गडद झाला.

भरारी पथकाच्या अहवालात परीक्षा केंद्रावरील अपुऱ्या सुविधा, सीसीटीव्ही फुटेजमधील निरीक्षणे तसेच काही कर्मचाऱ्यांकडे सापडलेले मोबाईल फोन यांचा उल्लेख करण्यात आला आहे. काही उत्तरपत्रिकांवर पेन किंवा पेन्सिलने केलेल्या विशिष्ट खूणा आढळून आल्याने ही कॉपी नियोजनपूर्वक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असून संबंधितांची जबाबदारी निश्चित केली जात आहे.

SSC Exam 2026: विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ सुरू; ‘कॉपीमुक्त अभियान’ अन् वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित…

या गंभीर प्रकाराची दखल घेत शिक्षण विभागाने तात्काळ २६ शिक्षकांना निलंबित केले आहे. शिक्षाधिकारी मंगल पुरे यांनी सांगितले की, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनीही परीक्षा केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली असून परीक्षेची पारदर्शकता आणि शैक्षणिक प्रामाणिकता अबाधित राखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Web Title: Mass copying in class 12 physics paper in washim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News : निकष न पूर्ण करणाऱ्या शाळांवर कारवाई; वाशिममधील २१ शाळांतील ३९ तुकड्या अपात्र
1

Washim News : निकष न पूर्ण करणाऱ्या शाळांवर कारवाई; वाशिममधील २१ शाळांतील ३९ तुकड्या अपात्र

सांस्कृतिक, शिवकालीन अस्मितेचा जागर व्हावा! आ. श्वेता महाले यांचे प्रतिपादन; करवंड महोत्सव आढावा बैठक
2

सांस्कृतिक, शिवकालीन अस्मितेचा जागर व्हावा! आ. श्वेता महाले यांचे प्रतिपादन; करवंड महोत्सव आढावा बैठक

डिजीटल शेती शाळा अभियानात सहभागी व्हा! सिंदखेडराजा कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांचे शेतकऱ्यांना आवाहन
3

डिजीटल शेती शाळा अभियानात सहभागी व्हा! सिंदखेडराजा कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Washim News : ‘लिंग गुणोत्तर’ वाढविण्यासाठी पुढाकार; माहितीदाराला १ लाखांचे बक्षीस
4

Washim News : ‘लिंग गुणोत्तर’ वाढविण्यासाठी पुढाकार; माहितीदाराला १ लाखांचे बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.