
Risod Crime News
या कारणावरून प्रभाकर इंगळे यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर सुमारे २० मिनिटांनी प्रभाकर इंगळे व त्यांची दोन मुले यांनी कोणतेही कारण नसताना अरुण फुके या ऑटो चालकावर अचानक प्राणघातक हल्ला केला. असा आरोप तक्रारीत करण्यात आला. यावेळी तक्रारकर्ते साईलिला ऑटो युनियन अध्यक्ष राहुल जुमडे, भारत मोठे, अरुण फुके, लक्ष्मण फुके, भगवान तेलगे, रमेश पवार, सुरेश पवार, विठ्ठल दवंड, दीपक दालवे, कतोशीप, भीमराव शिरसाठ, अशोक खंदारे, आदी युनियन सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
ही संपूर्ण घटना पोलिस स्टेशनकडून बगडिया यांच्या घरावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली. त्यामुळे ते फुटेज तपासून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करून साईलीला ऑटो युनियनच्या सदस्यांना न्याय द्यावा, अशी मागणी साईलिला ऑटी युनियन अध्यक्ष राहुल जुमडे वानी रामेश्वर चव्हाण ठाणेदार रिसोड यांच्याकडे केली. या घटनेमुळे रिसोडमधील ऑटोचालकमाये संतापाचे वातावरण असून, शहरातील वाढत्या दादागिरीला आळा घालण्याची मागणी होत आहे.
Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला, बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता