Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHT CET PCB Result : पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) एमएचटी-सीईटी 2026 च्या पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) समूहाच्या पहिल्या प्रयत्नाचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून स्कोअरकार्ड डाउनलोड करता येणार असून प्रवेश प्रक्रियेला यामुळे वेग मिळणार आहे. निकालामध्ये विषयनिहाय गुण, पर

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 07:06 PM
पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

Follow Us
Follow Us:
  • पीसीबी समूहाच्या सीईटी परिक्षेत ११ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण
  • सर्व ११ विद्यार्थी राज्यातील, यातील ३ विद्यार्थिनी तर ८ विद्यार्थी
  • पीसीबी समूहाच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर
सोनाजी गाढवे / पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) व कृषी शिक्षण (Agriculture Education) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीच्या पीसीबी सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या या सीईटी परीक्षेमध्ये ११ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यातील ८ विद्यार्थी असून ३ विद्यार्थिनी आहेत तर यातील सर्व ११ विद्यार्थी राज्यातील असून एकही विद्यार्थी महाराष्ट्र बाहेरील राज्यातील नाही. सदरचा निकाल विद्यार्थ्याच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल.

सीईटी प्रवेश परीक्षा दिनांक २१ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ रोजी सहा दिवसामध्ये ११ सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण २ लाख ८४ हजार ०६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत ११ सत्रात मिळून २ लाख ६३ हजार २१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १ लाख ३ हजार ३६० विद्यार्थी होते व १ लाख ५९ हजार ८४८ विद्यार्थिनी होत्या तर ५ तृतीयपंथीय होते. यामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या जास्त आहे. याला ९२.६६% विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

NEET 2026 Exam : ‘नीट’ फेरपरीक्षा ‘या’ तारखेला होणार; पेपर लीकच्या अफवांवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे मोठे विधान पहा एका क्लिकवर..

ही सीईटी परीक्षा राज्यातील २ लाख ६१ हजार २२२ तर राज्याबाहेरील १९९१ विद्यार्थ्यांनी दिली. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यातील १८६ परीक्षा केंद्रावर संगणकाधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने घेण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही.

१०० पर्सेंटाईल गुण मिळविणारे ११ विद्यार्थी

पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या या सीईटीमध्ये एकूण ११ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. राज्यातील नागपूर येथील आदित्य अभिषेक सोमाणी, पालघर येथील कुमारी झील हितेश छेडा, मुंबई शहर येथील ॲशले कोस्टॅनसीओ फर्नांडिस,कोल्हापूर येथील अथर्व उत्तम गडदे, सोलापूर येथील कुमारी प्रतीक्षा दीपक गाढवे, धुळे येथील अथर्व अविनाश काकुळडे, सांगली येथील सार्थक महेश पाटील, कोल्हापूर येथील साहिम सादिक पटवेगर, पुणे येथील कुमारी राशी अमितकुमार चोप्रा, ठाणे येथील सौरीश सेन व पुणे येथील वरद अवधूत वैद्य या राज्यातील ११ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. यामध्ये ३ विद्यार्थिनी आहेत. या निकालामध्ये यावेळेस राज्याबाहेरील एकही विद्यार्थी १०० टक्के पर्सेंटाइल मिळविणारा नाही.

प्रवर्गनिहाय सर्वोच्च पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी

– खुला प्रवर्ग पर्सेंटाईल
-आदित्य अभिषेक सोमाणी, नागपूर – १००
-कुमारी झील हितेश छेडा, पालघर – १००
-ॲशले कोस्टॅनसीओ फर्नांडिस, मुंबई शहर -१००
-सार्थक महेश पाटील, सांगली- १००
-कुमारी राशी अमितकुमार चोप्रा,पुणे- १००
-सौरीश सेन, ठाणे – १००
-वरद अवधूत वैद्य, पुणे -१००
एससी प्रवर्ग (SC)
-वैदेही विजय कांबळे, कोल्हापूर- ९९.९९
एसटी प्रवर्ग (ST)
-भावेश सुरेश चव्हाण, रत्नागिरी- ९९.९८
ओबीसी प्रवर्ग (OBC)
-कुमारी प्रतीक्षा दीपक गाढवे, सोलापूर १००
– अथर्व अविनाश काकुळडे,धुळे १००
– साहिम सादिक पटवेगर,कोल्हापूर १००
एसबीसी प्रवर्ग (SBC)
– पुनम तेजस नेमाने, कोल्हापूर- ९९.९९
एसइबीसी प्रवर्ग (SEBC)
– समीर अभय जाधव, कोल्हापूर – ९९.९९
डीटी/ व्हिजे प्रवर्ग (DT/VJ)
– गिरीश मंगलसिंग गोठवाल, जळगाव – ९९.९७
एनटी १ बी प्रवर्ग (NT1 B)
-प्रसाद रमेश पुरी, नांदेड – ९९.९८
एनटी २ सी प्रवर्ग (NT2 C)
– अथर्व उत्तम गडदे, कोल्हापूर- १००
एनटी ३ डी प्रवर्ग (NT3 D)
-विश्वजीत महादेव लाटे, सांगली- ९९.९४

PM Internship Scheme: एनसीसी महाराष्ट्रचा ‘युनिफॉर्म ते प्रोफेशन’ उपक्रम काय आहे? कॅडेट्सना कॉर्पोरेट क्षेत्रात कशी मिळणार संधी?

Web Title: Mht cet pcb first attempt result declared maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCB

संबंधित बातम्या

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
1

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
2

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
3

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
4

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.